मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककवि कृत पदे|
रामकविकृत पदें १२६ ते १३०

रामकविकृत पदें १२६ ते १३०

पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.


पद १२६ वें.

कृष्णचरणी सतत लीन प्रेमें असावें ॥ध्रुवपद.॥
वर्णाश्रमधर्मयुक्त निरहंकृति कर्म करुनि ।
फलइच्छा त्यजुनि मनीं ईश्वरीय  पावे ॥कृष्ण०॥१॥
अहंममता लोभभयें द्दगद्दश्य त्यजुनी सर्व ।
एक देव न्शिदिनीं स्मर अंतरीं भजावें ॥॥कृष्ण०॥२॥
नवविध भक्ति आंचरूनि आत्मन्वेदनीं सपर्पुनि ।
मायानदी उल्लंघुनि निजरूपीं रमावें ॥कृष्ण०॥३॥
अच्युतसुत राम म्हणे पूर्णानंदी सुख घेउनी ।
रामनाम मुखी वदुनि हरिपदीं रंगावे ॥कृष्ण०॥४॥

पद १२७ वें.

हरिचरणीं प्रेम घरीं मन ! रे अरे मना ! मी किति तुज विनवूं  ॥ध्रुवपद.॥
त्रैलोकीं हिंहुनि सुख घे दिननिशिं । अझूनि सावध होइशी ना रे ! ॥हरि०॥१॥
बहु पुण्य़ करुनि नरतनुप्राप्ति । यांत सार्थक करिसि ना रे ! ॥हरि०॥२॥
द्दगद्दश्य सर्व निसरुनि द्वैत । एक आत्मा स्मर धरिसि ना रे ! ॥हरि०॥३॥
वासनेचा क्षय करूनियां वोधें । भवसिंधु पार होसिना रे ! ॥हरि०॥४॥
राम म्हणे आतां हेंच या साधनीं । कृष्णचरणीं अनन्य रमसिना रे  ! ॥हरि०॥५॥

पद १२८  वें.

गुणमय सुंदर मूर्ति हरिची ॥ध्रुवपद.॥
श्यामतनु गोजरी नेत्र विशाळ । वदनीं मुरली मधुर ध्यनिची ॥गुण०॥१॥
मस्तकीं मुगुट गळां वनमाळा । अंगी उटि केशराची ॥गुण०॥२॥
गुण रत्नमय कुंडल भाळी टिळक । घोंगडी काळी जरिकांठाची ॥गुण०॥३॥
ऐसा हा घननीळ यशोदेमंदिरीं । आवडि गोपिकांची  ॥गुण०॥४॥
राम म्हणे कृष्ण व्यापक पूर्ण । चरणीं प्रीति जडली मनाची ॥गुण०॥४॥

पद १२९ वें.

गुरुचरणीं लीन सख्या ! होय लौकरि ॥ध्रुवपद.॥
काळ प्रचंड अतिक्रूर । याचें भय मानीं थोर ।
आतां स्वहित करीं झडकरि ॥गुरु०॥१॥
अन तुझें बहु चपळ । विषयसंगीं अतिविपुल ।
तेणें जन्म गेलें बहुपरि ॥गुरु०॥२॥
आतां सर्व भ्राम्ति त्याग । हरि ध्याईं अंतरंग ।
येणें मायामोहो निवारीं ॥गुरु०॥३॥
सर्वभूतीं देव स्मरीं । हेंचि ध्यान सतत धरीं ।
मग निजपद पावसि त्वरी ॥गुरु०॥४॥
राम म्हणे हेंचि साधन । अनन्य उपाय नाहीं याविण ।
कृष्णचरणीं प्रीति तूं धरीं ॥गुरु०॥५॥

पद १३० वें.

क्षणभंगुर हें खरें । मना ! रे ! सावध होईं त्वरें ॥ध्रुवपद.॥
अहंममता लोभेंकरुनि । फिरवी देशांतरीं ।
काळ तुला त्वरित ग्रासी । येति गर्भवास रे ! ॥क्षण०॥१॥
वासनेच्या छंदें विषय घेसि । तृप्ति तुझि नाहीं रे ! ।
नरतनु दुर्लभ भ्रांति सांडीं । चुकवी जन्मांतरीं ! ॥क्षण०॥२॥
अध्यात्मबोधें वैराग्ययुक्ग । हरितें नित्य स्मरीं रे ! ।
भूतीं देव ध्याउन सतत । निजपदीं स्थिर होईं रे ! ॥क्षण०॥३॥
राम म्हणे शरण साधुसि जावें । अन्य उपाय नाहीं रे ! ।
रामनाम मुखी वदुनि कृष्ण - । पदी लीण होईं रे ! ॥क्षण०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP