रमणतनयकृत पदें ६० ते ६२
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद ६० वें.
जातसे वय हें वायां कां रे ! तुम्ही नायका ? ।
क्षणभंगुर देह शाश्वत मानुनि कां न भजसि यदुनायका ? ॥ध्रुवपद.॥
चित्स्वरुपीं मन लावुनि सेविसि नामामृत रसना एका ।
विषयसुखीं रमतां तूं होशिल पात्र रविसुतसायकां ॥कां०॥१॥
विषवा विषय समस्त गृहादिक त्यज सुतधनपशुबायका ।
सत्संगति साधुनियाम सेविसि गुरु अक्षयपददायका ॥कां०॥२॥
कनकीं नग, घटिं माति, सुतीं पट, तैसें जाण रुपा एका ।
रमणतनय सद्नुरुचरणी रत आवडि हरिगुणगायका ॥कां०॥३॥
पद ६१ वें.
हरिविण मज गमेचि ना वो ! ॥ध्रुवपद.॥
कमललनयन प्रभु जलधिशयन हरी ।
ज्याला सुरवर स्तविति सनकशुकविधिहरनिगमागमें ॥हरि०॥१॥
नंदात्मज आनंदकंद वृजललनेसि रमे ।
गोधनपाल दयाळ पाहतां भव हा उपशमे ॥हरि०॥२॥
मुरलि अधरिं धरि वाजवि मंजुळ ऐकुनि त्रिभुवन भ्रमे ।
मारजनक सकुमार श्याम येइल मंदिरिं मज गमे ॥हरि०॥३॥
जाय सखे ! हरिपाय धरुनि उपाय हाचि करशील क्रमें ।
रमणात्मज विनति करी आणीं श्रीवर कल्पद्रुमे. ॥हरि०॥४॥
पद ६२ वें.
सोडीं सोडीं तूं माया रे ! ॥ध्रुवपद.॥
नदीदोका ह............... ॥सोडीं०॥१॥
तंतु पट घट.............. ॥सोडीं०॥२॥
गुरुप्रती रमणात्मज झाली मोक्षप्राप्ती ।
अनुदिनं विश्वस्वरुपीं दावीं तव पाय रे ! ॥सोडीं०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP