गोविंदकृत पदें १८१ ते १८३
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद १८१ वें.
वैकुंठाधिपती ! द्यावी भजनीं भव्य मती. ॥ध्रुवपद.॥
शुकसनकादिक नारद तुंबर। प्रेमें तुज गाती. ॥द्यावी० ॥१॥
ब्रह्मा हर सुरवन किन्नर । मुनि हृदयीं ध्याती ॥ द्यावी० ॥२॥
गोविंदप्रभो ! नरहरिराया !। अद्भुत तव कीर्ती ॥ द्यावी० ॥३॥
पद १८२ वें.
ते जगिं धन्य सती हो ! । जीच्या स्मरणें अघ हरती ॥ध्रुवपद.॥
पतिवांचुन अन्यत्र न जाणे । विधिहरकमलापति हो ! ॥ ते० ॥१॥
रवि माने आज्ञा, कर जोडुनि । सुरनरमुनि स्तविती हो ! ॥ ते० ॥२॥
गोविंदावरि करुण करुनी । दे मतिला स्फूर्ति हो ! ते० ॥३॥
पद १८३ वें.
ते पद दावीं मजलागुनि सीताकांता रे ! ।
दर्शनमात्रें निवारीं भवभयव्यथा रे ! ॥ध्रुवपद.॥
पदतल मृदु हे अरुणापरि शोभा साजे ।
पावन ब्रिद हें असुरावरि पैं जन गाजे ॥
ध्वजवज्रांकुश हीं चिन्हें त्यांत विराजे ।
योगिजनाचें मन रंजित पाय असे जे. ॥ ते पद० ॥१॥
पदरजस्पर्शें उद्धरिली पद्मजबाळा ।
तेथुनि जाली मंदाकिनी शुद्ध जळाला ॥
मस्तकिं धरितां श्रीशंकर तो सुखि जाला ।
ज्या पदकमळा हृत्कमळीं सेवित कमळा ॥ ते पद० ॥२॥
शुकसनकादिक ध्रुवनारद ज्यातें गाती ।
योगिजनाच्या प्रेमाची विश्रांती ॥
दर्शमात्रें जडजीवां होते मुक्ती ।
गोविंदाची पुरवीं रामा ! प्रीती ॥ ते पद० ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP