रामकविकृत पदें ९१ ते ९३
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद ९१ वें.
काय सांगूं याचें माहात्म्य तुला रे ! ।
निजरुपच जेथें द्वेतसंभव नाहीं रे । ॥ध्रुवपद.॥
वेद मौनावले वाचा परतल्या ।
मनासि अप्राप्य, सुगम कसें रे ! ॥काय०॥१॥
साधने करुनि प्राप्त करिसि ।
हा संपूर्ण मिथ्या भ्रम विचार रे ! ॥काय०॥२॥
कृष्ण कृपा करि । कांहींएक घडे ।
यास्तव तूं अनन्य होईं रे !॥काय०॥३॥
अच्युतसुत राम आनंदें ।
देवा ! तुला प्रेमें शरण रे ! ॥काय०॥४॥
पद ९२ वें.
कृष्णा ! तूं लौकर येईं रे ! ॥ध्रुवपद.॥
दीनदयाळा भक्तवत्सला । म्हणुन तुला प्रार्थितों रे !॥कृष्णा०॥१॥
वेदाज्ञेकरुनि सत्कर्मि रत । हेंही अर्पण तुला रे ! ॥कृष्णा०॥२॥
सर्वांभूतीं तूंचि देव स्मरूनियां । भक्तिभाव घ्यास होतो रे !॥कृष्णा०॥३॥
अच्यु तसुत राम अनन्य देवा ! । चरणि ठाव देईं रे ! ॥कृष्णा०॥४॥
पद ९३ वें.
सावध हौनि सद्भावें । शरण जावें गोपाळा रे ! ॥ध्रुवपद.॥
जो परात्परनिगम अगोचर । तेथे तूं अनन्य होई रे ! ॥साव०॥१॥
मीपण त्यजुनि शुभाशुभ कर्म । न जाणोनि हरितें अपीं रे ! ॥साव०॥२॥
सर्व संकल्पाचा न्यास करूनियां । कृष्णाते ह्रुदयीं घ्याईं रे ! ॥साव०॥३॥
अहर्निशिं मुखि रामनाम वदोनि । जन्ममरण निवारी रें ! ॥साव०॥४॥
अच्युतसुत रामभक्ति करूनि । या संसारीं हेंचि सार्थक रे ! ॥साव०॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP