मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
एकाग्र चित्ते करून गौर गड...

लावणी - एकाग्र चित्ते करून गौर गड...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


एकाग्र चित्ते करून गौर गडे जन्मांतरी पुजली ।

म्हणुन स्वरुप संपदा तुला ईश्वरे अचळ दिधली ॥धृ०॥

खुब केला श्रृंगार हिरेमाणिक-मुक्ताभरणी ।

उजेड पडे चहुकडे थेट बनलीस चंद्रकिरणी ॥

करून प्रातःस्नान अगोदर वंदुनीया तरणी ।

पद्मासनी बसलीस लक्ष ठेउन नामस्मरणी ॥

डौलदार सोन्याची झगझगित बहुत उपकरणी ।

दोहो बाजूस ब्राह्मण सदय वेदांती पुरश्चरणी ॥चाल॥

धन्य तो नवरा तू नोवरी ॥

दैव काढिलेस जोरावरी ॥

कोणी सखी शालजोदि आवरी ॥

पदर कोणी पल्लेदार सावरी ॥

वारी कोणी माशा वरचेवरी ॥

पुढे चौरंग संगमरवरी ॥

मेघडंबरी देव्हारा वरी ॥

लिंग त्यामधे शुद्ध नरवरी ॥

गवई गर्जतात आसावरी ॥

वाद्ये वाजती दिवा शर्वरी ॥चाल॥

ऐकुनी आशा उपजली ।

दर्शन होता भ्रांत उडाली सहज मनामधली ॥१॥

चार चंबु चहुकडे चकचकीत गंगोदके भरले ।

आगरबत्तीचे सुवासने सरवे पंचप्राण मुरले ॥

जिल्हइदार अपकरे वाटते आज चरकी धरिले ।

बिंब दिसे कलशात शुद्ध अवयव शरिरावरले ॥

सुरेख चौक्या सुरेख समया मोर सुबक वरले ।

तर्‍हेतर्‍हेचे पदार्थ ताटी भरून किती उरले ॥चाल॥

काल्पीची साखर लोणी साय ॥

दुधाने हातच पोळेल हाय ॥

फुलांस्तव केले कचे उपाय ॥

पाच मखा दौणा याशिवाय ॥

सन्मुख निर्मळ कृष्णा गाय ॥

वसिष्ठे पाठविली काय ॥

अलंकाराने नटली माय ॥

सुशोभित दिसती चारी पाय ॥

वासरू दुडदुडचहुंकडे जाय ॥

सदा सुप्रसन्न बाजीराय ॥चाल॥

तयांच्या कृपेने विराजली ।

थोर तुम्हांला श्रमे साध्य ही पदवी लाधली ॥२॥

गुळगुळित भुई खाली छताला वर आरसे जडले ।

वेलबुटी सारखी खांब सरुदार कसे घडले ।

रंगीत गज झरुक्यास कारगिर अमोल सापडले ।

ठिक ताट्या तावदानी अमेरी डौल कोणी कडले ॥

इतर स्त्रिया काजवे तुला ते पाहुनिया दडले ।

अलंकार छत स्वरुप यांचे पाहा प्रकाश पडले ॥चाल॥

भींतीवर लिहिली चित्रे फार ॥

गजानन शंकर पार्वती कुमार ॥

सागरमंथन दशावतार ॥

पुरंधर ऐरावतीवर स्वार ॥

रामरावण युद्ध अनिवार ॥

हे कौरव पांडवांचे दळभार ॥

चतुर्भुज मुरलीधर सकुमार ॥

गजेंद्र नक्राचा उद्धार ॥

वर्षती अमर सुमन संभार ॥

मांडिला महिषासुर संहार ॥चाल॥

अंबिका अती सुंदर सजली ।

भुते गोंधळ घालिती हाती कोणी घेउन पोत बुधली ॥३॥

जानकिचे सौंदर्य विलोकुन लंकेश्वर भ्रमले ।

धनुष्यास उचलिता सर्व बळ खर्च करुन दमले ।

रुक्मिणिच्या स्वयंवरास नृपवर भले भले जमले ।

असाध्य झाली सती तिने वैकुंठ पती नमले ॥

द्रौपद राजा घरी भीमार्जुन अधीर ब्राह्मण गमल ।

शरसंधाने यंत्र भेदिता कैक रिपु शमले ॥चाल॥

काढिले गोकुळ वृंदावन । द्वारके सभोवती जीवन ।

अयुध्या मथुरा नंदनवन ॥

रमा करी हरीचे पदसेवन ॥

जाळि मुचकुंद काळियावन ॥

पंधरी संतांचे भुवन व अमोलिक जागा हे उपवन ॥

पाहवेना दृष्टिने तव यौवन ॥

करो कल्याण पतितपावन ॥

गंगु हैबति कवी गावन ॥चाल॥

महादेव कविची मति झिजली ।

सुगर प्रभाकर म्हणे इमारत खाशी बांधली ।

एकाग्र चित्ते करून ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP