मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
दुर निज लासि का रे समय सु...

लावणी - दुर निज लासि का रे समय सु...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


दुर निजलासि का रे समय सुखाचा पाहून ।

काय करू मी आता, करि घरी ये रे धाउन ॥ध्रु०॥

जिवलग जीविंचा सखा तुजविण कोणी नाही ।

सुखादुखाचा रे साथी, मनि विचारुन पाही ॥

चुक जरी पडली घडली मजपुन रोज काही ॥चाल॥

तरी धीर देउन मनासी घे रे सख्या सर्व पाहून ॥१॥

नव्या नवतिची तनु ऐन भरत आली।

ख्यालिखुशालित सदा लुटा रसरंगलाली ॥

नका दिस दवडू सुना, अशा वैभवात महाली ॥चाल॥

घडोघडी कवळुन मला बसा आनंदात घेऊन ॥२॥

कसा तरि जिरसिल तू रे काळजी हीच पडली ।

म्हणुन झुरणी जिवा अशा शरिरास जडली ॥

नको करू निष्ठुर मन अनायसे प्रित घडली ॥चाल॥

कर समजावणी तू आत एकांतात नेऊन ॥३॥

म्हणे गंगु हैबती ग ठिव लय लक्ष पाई ।

मन मर्जी रक्षुन रहा नको करू व्यर्थ घाई ॥

महादेव गुणी जन नित नवे छंद गाई ।

प्रभाकर ख्याल करी नवल परी अर्थ लाऊन ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP