मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
पदोपदी अपराध माझे तर किती...

लावणी - पदोपदी अपराध माझे तर किती...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


पदोपदी अपराध माझे तर किती मुखाने उच्चारावे ।

सर्वोपरी अन्यायी तिथे काय अवगुण गुण विचारावे ॥धृ०॥

दीन दुर्बळ पाहुन घेतले आपण अगोदर पदरात ।

शरम ठेउन ती मनात माझा शेवट लावा आदरात ॥

धरू नये धरले हाती आता नये लोटू भयंकर विवरात ।

कोमल करी कुरवाळुन घाला दुर्गण सारे उदरात ॥

देह दोन परी भिन्नभाव नाही प्राण एक दोहो शरिरात ।

नसेल हे सत्य तरी मी दिव्य करिन ह्या नगरात ॥चाल॥

कोण कोणते धर्म तुम्हाला लउन भिउन म्या आचरावे ॥१॥

विश्वकुटुंबी आपण काय जड झाला एक जीव थोरांसी ।

आता दिनाने हे पाय सोडुन जावे कुणाच्या द्वारासी ॥

ओहोळ अमंगळ गंगाजळी मिळाल्यावर त्या दोष जरासी ।

कुठे राहिला प्राण विसाव्या सांगा समजुन गुणराशी ॥

शब्द सुखाचा देउन बोलता होइल सौख्य ह्या शरिरासी ।

बहुतांपरी पाळिते माझ्या ध्वजा लागल्या शिखरासी ॥चाल॥

वियागानळे मनी जळते पळपळ किती विकल जिव आवरावे ॥२॥

पदर पुढे पसरून उभी कशी करुणा नये दीनदुबळ्याची ।

चाहिल ते धन देउन इच्छा आपण पुरविली सगळ्यांची ॥

प्रीतिची प्रियकरीण असता मी कांता हो जिव्हाळ्याची ।

दूर धरिता का इतर स्त्रियांसारखी सख्या नव्हे चाळ्यांची ॥

गोरा रंग सर्वांग सडक वर पातळ कंचुकी वाळ्याची ।

नटुन तुम्हाला झोके देते कडी धरुन झोपाळ्याची ॥चाल॥

येता जाता हसुन एकांती कुच कवळुन दोन्ही धरावे ॥३॥

उभी करून पहा रुपास भिडवुन देह संदुक सुवर्णाची ।

याचक मी तुम्ही धर्मवासना अंगिकारली कर्णाची ॥

प्रीत द न द्या अभयकरे आहे दास सदोदित चरणांची ।

नका जिवा न दूर करू या गाठ मनी द्या स्मरणाची ॥

गंगु हैबती कवी शब्द कौशल्य गोड पुरी पुरणाची ।

गाती श्रीमंतांपुढे महादेव तारिफ त्यांच्या करण्याची ॥चाल॥

गुणि राजाचा जडित घडित नग प्रकार कवनी उतरावे ।

प्रभाकराच्या किती गुणावर होती लंपट गुणिजन रावे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP