सवार होकर चले मुसाफर किधर इधर नै नजर पुकारत धरी ।
शब्द उल्लंघुन जातो असे अपराध केले काय तरी ॥ध्रु०॥
दोस्त पीहुके दुरुस्त कहती मुसे सबी बदमस्त हमजसे हुव ।
ढुंकुन पहाना कुणी अता उपचार तुमचे कशास हवे ॥
रोते रोते सोति पलंगपर चुपी नयनदो रयन बुंदसे चुवे ।
भोग भोगिले सख्या सहित आदराने रात्री नित्य नवे ॥
छांड चले मुज किसे पूच कर कहो भरे जिये चौक मान्य कुवे ।
प्राण त्यजिन आपला व्यर्थ करवुन गेले गोठ जवे ॥
कछू सुजेना सुनो पिंहुबिन मुजे मारलेऊ पारगलेसे छुरी ।
आता काय जिव ठेउन मला ग पतिराज गेले त्यजुन दुरी ॥१॥
बडे मेहेल खुब खडे गगनसे भिडे बंधे सब तुजे खुदाने दिया ।
सर्व सिद्ध सदनात अर्धे वचनात मैथुन काळी स्त्रिया ॥
फजरसे जाकर बैठि पलंगपर मुकर विगर पूछ निकल गये क्यो मिया ।
अधर कपिला गळा लळा लाउन त्यजिली प्राणप्रिया ॥
चैन नहि मुज पलख तुजेविन खलक कतोरा हातन हिस्का लिया ।
कोण असेलरे कामिना दुजी शहरा माजी करिल हिया ॥
एक बार मानती नहि मै सुति कहोजी मत बात हमनसे बुरी ।
शिरी काटी बांधून फिरेन सगळे घेउन पहाड उरी ॥२॥
ज्योगन होकर फिरू धूंडती तुजे मुजे नही भावे कछु पिहू बिना ।
काय करावे व्यर्थ सर्व सख्यास माझ्या कोणी आणा ॥
छोठे पनमे कीई शादी लगाइ हलदी हती जब अजान सबका सुना ।
कधी न घडते असे आता आठवुन राहावे सगुण गुणा ॥
भर ज्यानीका तबर मदन करे कहर सखी देहतन जलबल होगये चुना ।
घालून गळ्यामधी कफनी फिरेन मुलकामाजी घेउन विणा ॥
भजन करूंगी ढुंड फिरूंगी न्हाउ तीरथ सब गंगा जमना भरी ।
शोध करुन वाढिन ताटी स्वामींस आपल्या शिरापुरी ॥३॥
मत अटकावो कोई हमनसे अबी सबी मै छांड निकलकर खडी ।
सौख्यसंपदा त्यजुन घेउन वैताग जहाले केवळ सडी ॥
डालि गलेबीच सैलि हात लिई झोली, मंगाई तुंबी रंगाकर बंडी ।
मुळामुठा पहिल्या, उद्या लागेल भिवरा दोहो थडी ॥
गंगु हैबती ख्याल बनाते मिटे तुटे जंजाल लपट होपडी ।
असा जिचा संकल्प येउन भेटले प्रियकर घडोघडी ॥
महादेव गुनिराज कहे सुन आज खुदाने मेहेर तेरेपर करी ।
प्रभाकराचे छंद बूंद ऐकुन येती लोक घरी ॥४॥