मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
अहो याहो तिळगुळ घ्याहो आव...

लावणी - अहो याहो तिळगुळ घ्याहो आव...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


अहो याहो तिळगुळ घ्याहो आवडिने आलिंगन द्याहो ॥ध्रु०॥

वर्षाची सण संक्रत । आहे स्वस्थ समय एकांत ॥

आज संनिध नाहित कांत । मग काहो उभे द्वारात ॥

हात धरता नये लोकांत । करी मदन पाहुन आकांत ॥चाल॥

प्रियवंता रसिक रसेल्या । मजपासी गोष्टि अशेल्या ॥

विषयाच्या सबळवशील्या ॥चाल॥

समजल्या खुब्या तुमच्या हो ॥१॥

उलटुन का जावे घरास ।

पहा नेत्र भरुन उरास ॥

व्हावे सन्मुख समरी शूरास ।

घ्यावे सुरत द्युतांत वीरास ॥

केली निर्मळ महाली आरास ।

खपवुन चतुर फरास ॥चाल॥

भवताले घोस जरीचे ।

सारे पडदे एक बरीचे ॥

तुम्ही केवळ लाल हरीचे ॥चाल॥

प्रीतिने मुखामृत द्याहो ॥२॥

जाती मजला कितीक दिपुनी ।

झेलिती हुकुम टपुनी ॥

कशी तुमच्या कामी खपुनी ।

झिजविते शरीर जपुनी ॥

घरी येते लपुनी छपुनी ।

नाही न्यून पडत मजपुनी ॥चाल॥

आपल्यामध्ये कपट नसावे ।

सुखरूप दोघांनी असावे ॥

यावे जावे घेउन बसावे ॥चाल॥

हवी तेव्हा पलंगी न्याहो ॥३॥

फुल भोगा नूतन नवाळे ।

मऊ माशुक मधुर मवाळे ॥

शरीर केवळ जिचेचवाले ।

आहे उंच वसन रिझलेले ॥

पहा ह्रदय करुन कनवाळे ।

काय निघते यात दिवाळे ॥चाल॥

गंगु हैबती साथी जिवाचे ।

ज्या मानिती पुरे दैवाचे ॥

गुरु वंदित महादेवाचे ॥चाल॥

करी चाली प्रभाकर ह्याहो ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP