मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
धीर न धरवे त्वरित आता प्र...

लावणी - धीर न धरवे त्वरित आता प्र...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


धीर न धरवे त्वरित आता प्राण सखा भेटवाग ॥ध्रु०॥

लाल जर्द नारिंग जसे रंग रसा मध्ये भरारते ।

गाल शरीर चहुंकडून तसे

दिसंदिवस बाई गरारते ॥

स्मरण पतीचे होते काळिज माझे थरार ॥चाल॥

ऊर आले चढून गडे, रसाळ लिंबा परी ॥

तटतटी चोळी जाई फाटुन, धुर कापरी ।

कमेना मला मी छेल छबेली परी ॥चाल॥

त्वरित सख्यानो तुम्ही तरी लुहुन पत्र पाठवाग ॥१॥

आपल्यावाणी नव्या तरण्या मिळवुन रात्री एकीकडे ।

ख्याति खुपालित काळ सदा कर्मित असतिल ते तिकडे ॥

कुठवर दम धरू आता करते रोदना मी इकडे ॥चाल॥

तुम्ही माझ्या मायबहिणी घ्या एवढा धरम ।

शेजारपणाची काही पडुद्या शरम ॥

काय करू आता रंगमहाली बिछोना नरम ॥चाल॥

प्रसन्न मजी पाहुन सखा निवळपणी गाठवा ॥२॥

येता जाता कोण आता कवटाळुन घेईल मुका ग ।

गुणमंदिर लावण्य दिवा ग पवित्र परिमळ उंच बुका ग ॥

मनापासुन भोगिता तया विसरून जाते तहानभुका ॥चाल॥

हवे तसे एकांती मजपासुन करविले ।

घेऊन मांडिवर नित्य मला भरविले ।

ते रत्‍न कसेग म्या पापिणिने हरविले ॥चाल॥

जरी निद्रा केलि असेल तरी गळ घालुन उठवा ग ॥३॥

हिरे पाच मोत्यांचे सखे सर्वांगावर डुब गहिने ग ।

त्यात बहार बिलोरी झाडे संगिन चौगर्दी अयने ग ॥

एक सख्याविण सारे सुने परदेशी मी बारा महिने ॥चाल॥

म्हणे गंगु हैबती स्वस्तपणे सुंदरी ।

हरी कृपा करिल जा सौख्य भोग मंदिरी ॥

महादेव कवीचे राज अंबिरी ॥चाल॥

प्रभाकराचे कवन मनी सुखशयनी पाठवा ग ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP