मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अठरावा|

एकनाथी भागवत - आरंभ

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


॥श्रीगणेशाय नमः ॥श्रीकृष्णाय नमः ॥

ॐ नमो कर्मप्रकाशका । सद्विद्याविधिविवेका ।

कर्मधर्मप्रतिपाळका । जगन्नायका गुरुवर्या ॥१॥

वर्णाश्रमादि मर्यादा । त्याचा सेतू तूं गोविंदा ।

तूं कारण वेदानुवादा । विवादसंवादा तूं मूळ ॥२॥

तूं शब्दसृष्टीचा अर्कु । तूं वेदगुह्यप्रकाशकु ।

तूंचि एकला अनेकु । व्याप्य व्यापकु तूंचि तूं ॥३॥

तूंचि तूं विधि विधान । तूं बोलका तूंचि मौन ।

एका आणि जनार्दन । दोनी संपूर्ण तूं गुरुराया ॥४॥

यालागीं श्रीभागवता । तूंचि अर्थ तूं कविता ।

तूंचि अर्थावबोधकता । हेंही बोलविता तूंचि आम्हां ॥५॥

जैशीं आपुलींचि उत्तरें । पडसादें होतीं प्रत्युत्तरें ।

तेवीं माझेनि मुखांतरें । तूं कवित्वद्वारें बोलका ॥६॥

बोलका श्रीभागवतीं । श्रीकृष्ण कृपामूर्ती ।

तेणें वर्णाश्रम‍उत्पत्ति । यथास्थिती सांगितली ॥७॥

सप्तदशाध्यायीं सुगम । सांगितले ब्रह्मचर्य-धर्म ।

गृहस्थाचें स्वधर्मकर्म । नित्यनेम निरूपिले ॥८॥

आतां अष्टादशाध्यायीं जाण । वानप्रस्थाश्रमलक्षण ।

संन्यासधर्माचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP