मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अठरावा|

एकनाथी भागवत - श्लोक ३१ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


नोद्विजेत जनाद्धीरो जनं चोद्वेजयेन्न तु ।

अतिवादांस्तितिक्षेत नाममन्येत कञ्चन ॥३१॥

जनापासोनि उद्वेगगती । ज्ञाता न पवे सर्वथा चित्तीं ।

निंदा अवगणना अपमानिती । ते आत्मस्थितीं स्वयें साहे ॥१४॥

जन जे जे उपद्रव देती । ज्ञाता साहे ऐशिया रीतीं ।

मीचि आत्मा एक सर्व भूतीं । यालागीं खंती मानीना ॥१५॥

आपुलिया अवयवविकारता । उद्वेग नुपजें जेवीं चित्ता ।

तेवीं सर्वांभूतीं एकात्मता । जाणून तत्त्वतां उबगु न मनी ॥१६॥

तैसेंचि ज्याचिया स्थितीं । भूतें उद्वेग न मानिती ।

ज्याचिया निजाचारगतीं । सुखी होती जीवमात्र ॥१७॥

सर्व भूतीं भगवंत आहे । झणें त्यासी उपद्रव होये ।

यालागीं वागवितां हातपाये । सावध राहे निजदृष्टीं ॥१८॥

थोर देतां आरोळी । झणें दचकेल वनमाळी ।

कां नेटें भवंडितां जपमाळी । देवाचे कपाळीं झणें लागे ॥१९॥

यालागीं करचरणांच्या चेष्टा । आवरोनियां निजात्मनिष्ठा ।

भूतीं लागों नेदी झटा । झणें वैकुंठा उपद्रव लागे ॥२२०॥

ऐसिऐशिया निजात्मगती । उद्वेग उपजों नेदी भूतीं ।

तेथ वाग्वादाची गती । कैशा रीतीं संभवे ॥२१॥

सर्वभूतीं भूतात्म ईश्वर । यालागीं उंच न बोले उत्तर ।

तेथ अतिवाद्यासी समोर । सर्वथा अधर उचलीना ॥२२॥

पडल्या जीवसंकट प्राणांतीं । अपमान न करावे कोणे व्यक्ती ।

अपमानीना भूताकृती । सर्वांभूतीं हरी देखे ॥२३॥

जनास्तव उद्वेगता । कदाकाळीं न पवे ज्ञाता ।

ज्ञात्यापासोनि उद्वेगता । नव्हे सर्वथा जनासी ॥२४॥

ऐशी निजात्मस्थिती साचार । तो कोणासीं न करी वैर ।

येचि अर्थीं शारंगधर । विशद उत्तर सांगत ॥२५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP