स्वयं सञ्चिनुयात्सर्वमात्मनो वृत्तिकारणम् ।
देशकालबलाभिज्ञो नाददीतान्यदाहतम् ॥६॥
ऋतुकाळीं फळें संपूर्णें । तीं कालांतराकारणें ।
संग्रहो सर्वथा न करणें । व्रतधारणें वनस्था ॥३२॥
पूर्वदिवसीं फळें आणिलीं । अपरदिवसीं जरी उरलीं ।
ती अवश्य पाहिजे त्यागिलीं । नाहीं बोलिलीं आहारार्थ ॥३३॥
प्रत्यहीं आहारार्थ जाण । फळें आणावीं नूतन ।
जीर्ण फळांचें भक्षण । निषिद्ध जाण वानप्रस्था ॥३४॥
आणिकें फळें जीं आणिलीं । तीं अंगीकारा निषिद्ध झालीं ।
जीं स्वकष्टें अर्जिलीं । तींचि वहिलीं आहारार्थ ॥३५॥
देश काळ वर्तमान । इत्थंभूत कळलें ज्ञान ।
तरी संग्रह न करावा जाण अदृष्टधारण निर्धारें ॥३६॥
पराचा प्रतिग्रहो पूर्ण । सर्वथा न करावा आपण ।
प्रतिग्रह घेतां जाण । व्रतखंडन वानप्रस्था ॥३७॥