मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अठरावा|

एकनाथी भागवत - श्लोक २० वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


एकश्चरेन्महीमेतां निःसङ्गः संयतेन्द्रियः ।

आत्मक्रीड आत्मरत आत्मवान् समदर्शनः ॥२०॥

सदा वैराग्य अंगीं पुरतें । जो अपेक्षीना सांगात्यातें ।

निःसंग होत्साता चित्तें । सुखें पृथ्वीतें विचरतु ॥२६॥

इंद्रियें बांधोनि चित्ताच्या पायीं । चित्त लावी चैतन्याच्या ठायीं ।

तेणें चिन्मात्र ठसावें पाहीं । देहत्व देहीं स्मरेना ॥२७॥

ऐसा आत्मस्थितीचा उद्यम । तेणें आत्मक्रीडेचा आराम ।

आत्मसुखाचा संभ्रम । अनुभव परम तो ऐक ॥२८॥

आत्मस्थिति निजात्मयुक्त । तेणें आत्मसुखें उल्हासत ।

सदा समदर्शनें डुल्लत । वोसंडत समसाम्यें ॥२९॥

ऐशिया समसुखाची संपत्ती । भोगावया सुनिश्चितीं ।

सदा एकाकी वसे एकांतीं । तेंचि श्रीपती सांगत ॥१३०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP