शौचमाचमनं स्नानं न तु चोदनया चरेत् ।
अन्यांश्च नियमान् ज्ञानी यथाहं लीलयेश्वरः ॥३६॥
आचमन स्नान शौचाचार । करितां नव्हे विधिकिंकर ।
कर्माभिमानाची मोडली थार । जैसा मी अवतार तैसा तो ॥५२॥
जैसा मी `लीलावतार' धरीं । अलिप्तपणें कर्में करीं ।
तैसीचि जाण योग्याची परी । सर्व कर्माचारीं अलिप्त ॥५३॥
ज्यासी विधींचें भय नाहीं पोटीं । तो कर्में करावया कदा नुठी ।
तेचि विखींची विशद गोठी । कृष्ण जगजेठी सांगता ॥५४॥