अन्वीक्षेतात्मनो बन्धं मोक्षं च ज्ञाननिष्ठया ।
बन्ध इन्द्रियविक्षेपो मोक्ष एषां च संयमः ॥२२॥
ऐक्यें पावोनि एकात्मता । तेथूनि बंधमोक्ष पाहतां ।
दोंहीची मिथ्या वार्ता । मायिकता निश्चित ॥३८॥
प्रवृत्तीमाजीं बंधमोक्षता । त्या दोंहीची विभागता ।
इंद्रियांची जे विषयासक्तता । `दृढबद्धता' ती नांव ॥३९॥
काया-वाचा-चित्तवृत्तीं । निःशेष विषयांची विरक्ती ।
या नांव साचार `मुक्ति' । जाण निश्चितीं उद्धवा ॥१४०॥
ज्यासी साचार पाहिजे मुक्ती । तेणें करावी विषयनिवृत्ती ।
हेचि मुख्यत्वें उपायस्थिती । कृष्ण कृपामूर्ती सांगत ॥४१॥