देहमुद्दिश्य पशुवद् वैरं कुर्यात्र केनाचित् ।
एक एवपरो ह्यात्मा भूतेष्वात्मन्यवस्थितः ॥३२॥
केवळ पशूचियापरी । होऊनियां देहअहंकारी ।
कोणासी वैर न करी । तेही परी परीयेंसी ॥२६॥
प्रकृति-पर चिदात्मा आहे । तोचि सर्वांभूतीं भूतात्मा पाहे ।
मजमाजींही तोचि राहे । ऐशी सर्व भूतीं एकात्मता जो ॥२७॥
त्यासी कोण आप्त कोण इतर । कोणासी करावें वैर ।
सर्व भूतीं मीचि साचार । निरंतर निजात्मा ॥२८॥
एक आत्मा सर्व भूतांत । येचि अर्थींचा दृष्टांत ।
स्वयें सांगे श्रीकृष्णनाथ । श्रोता सावचित्त उद्धव ॥२९॥
यथेन्दुरुदपात्रेषु भूतान्येकात्मकानि च ।