मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अठरावा|

एकनाथी भागवत - श्लोक ४७ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


वर्णाश्रमवतां धर्म, एष आचारलक्षणः ।

स एव मद्‍भक्तियुतो, निःश्रेयसकरः परः ॥४७॥

अनादि जो स्वधर्माचार । जो कां मोक्षकर साचार ।

तेणें स्वधर्में सकाम नर । लोकांतर वांछिती ॥४६॥

झालिया लोकांतरप्राप्ती । तेथूनि होय पुनरावृत्ती ।

न करूनियां माझी भक्ती । स्वधर्म नाशिती सकामें ॥४७॥

ब्राह्मणा आला भद्रजाती । आम्हां न पोसवे हा निश्चितीं ।

मग तो देऊनियां घेती । वाहावया पोथी वृद्ध ढोर ॥४८॥

यापरी स्वधर्म जाण । उपेक्षिती गा ब्राह्मण ।

मग लोकांतरीं कोरान्न । मागावया कण धांवती ॥४९॥

घरीं आणोनि दीघली कामधेनु । आम्हां न पोसवे म्हणूनु ।

ताकासाठीं देती हेळसूनु । आली नागवणु ते नेणे ॥३५०॥

तेवीं म्यां जाण गायत्रीमंत्र । दिधला ब्राह्मणांसी स्वतंत्र ।

तो उपेक्षूनियां मंत्रतंत्र । शूद्राचार आचरती ॥५१॥

सौर शाक्त गाणपत्यादि जाण । नाना मंत्रदीक्षा घेती ब्राह्मण ।

परी गायत्रीचें अनुष्ठान । एकही जाण न करिती ॥५२॥

नाहीं गायत्रीचें अनुष्ठान । परी विपरीत झालें आन ।

गायत्रीचें श्रेय जाण । देती ब्राह्मण द्रव्यार्थ ॥५३॥

गायत्रीमंत्र असोनि घरीं । तिचा भावार्थ कोणी न धरी ।

दीक्षेलागीं मूर्खाचे द्वारीं । लोळिजे द्विजवरीं ऐसें झालें ॥५४॥

शस्त्रास्त्रीं रथ सुदृढू । त्यावरी बैसविला भेडू ।

सांडूनि पळणें मानी सुरवाडू । न शके विभांडूं रणांगण ॥५५॥

तेवीं वेदरूप मी नारायण । ब्राह्मणहृदयीं असें जाण ।

त्याचें नेणोनि महिमान । वेदपारायण विकिती ॥५६॥

वांछूनियां स्वर्गफळ । नाना याग करिती प्रबळ ।

कामकल्पना केवळ । स्वधर्म विकळ पाडिती ॥५७॥

वेदीं प्रतिपाद्य कर्मफळ । तो वेदु मिथ्या नव्हे केवळ ।

तो वेदवाद समूळ । नेणोनि बरळ हा मानिती ॥५८॥

घ्यायवा वोखदाची वाटी । माता साकर दे चिमुटी ।

तें मुख्य फळ नव्हे दृष्टीं । जावया पोटींचा महारोगु ॥५९॥

तेवीं वेद बोले जें फळ । तें प्रवृत्तिरोचना केवळ ।

स्वधर्म विचारितां समूळ । चित्तमळक्षाळक ॥३६०॥

स्वधर्म सांडूनि सर्वथा । सकाम कर्में करूं जातां ।

तेंही शिणल्यावेगळें तत्त्वतां । क्षुद्रकामता फळेना ॥६१॥

जेणें द्रव्यें अमृत ये हाता । तें वेंचूनि मद्य घेतां ।

अधर्म आणि उन्मत्तता । पिशाचता जग थुंकी ॥६२॥

स्वपतीसीं काम भोगितां । परलोक पावि पतिव्रता ।

तोचि काम परपुरुषीं करितां । अधःपाता नेतसे ॥६३॥

जिह्वा दुरुक्ती बोलतां । यमप्रहार वाजती माथां ।

तिणेंचि `राम राम' म्हणतां । हरिभक्तां यम कांपे ॥६४॥

तेवीं पावोनि उत्तम जन्म । कर्म करूनि सकाम ।

भोगावें दुःख परम । मरण जन्म अनिवार ॥६५॥

तेणेंचि देहें स्वधर्म । करितां निरसे सकळ कर्म ।

निवारे मरणजन्म । बहुतां हे वर्म कळेना ॥६६॥

स्वधर्में घडे भगद्‍भक्ती । ऐशी अतिगुह्य आहे व्युत्पत्ती ।

ते मी सांगेन तुजप्रती । यथानिगुतीं उद्धवा ॥६७॥

स्वधर्म करणें आवश्यक । तेथें सांडणें फळाभिलाख ।

तेंचि `मदर्पण' चोख । न करितां देख संकल्पु ॥६८॥

हो कां घरिच्याचि रांजणीं । निघती मुक्ताफळांच्या श्रेणी ।

तरी कां ताम्रपाणीं । समुद्रमिळणीं शोधावी ॥६९॥

आपुलेच घरींचीं झाडें । फळती कल्पतरूचेनि पाडें ।

तरी अमरावतीचे चाडें । वृथा वेडे कां शिणती ॥३७०॥

हो कां सद्‍गुरूंचे तीर्थ घेतां । पाविजे परम पवित्रता ।

तरी धांवावया नाना तीर्था । विशेषता ते कायी ॥७१॥

कां ईश्वरत्वें पिता पूजितां । निजमोक्ष लाभे आइता ।

तरीं भजावें देवां देवतां । कोण्या अर्था सज्ञानीं ॥७२॥

तेवीं स्वकर्माचि करितां । लाभे आपली निष्कर्मता ।

ते स्वधर्मीं काम कल्पितां । जीव निजस्वार्था नाडले ॥७३॥

निर्विकल्पें स्वधर्माचरण । त्या नांव माझें `शुद्ध भजन' ।

तेणें भजनें हो‍ऊनि प्रसन्न । मी विवेक-वैराग्य-ज्ञान भक्तांसी दें ॥७४॥

तेणेंचि ज्ञानें होय शुद्ध मती । चित्तशुद्धीमाजीं परमभक्ती ।

ते भक्तीनें माझी परम प्राप्ती । भक्त पावती उद्धवा ॥७५॥

यालागीं नैराश्यें जें स्वधर्मकर्म । तेंचि माझें भजन परम ।

तेणें भजनें भक्तोत्तम । स्वयें पुरुषोत्तम हो‍ऊनि ठाकती ॥७६॥

यापरी स्वधर्मस्थितीं । लाभे आपुली निजमुक्ती ।

तेचि म्यां तुजप्रती । यथानिगुतीं सांगितली ॥७७॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP