अग्निपक्वं समश्नीयात्कालपक्वमथापि वा ।
उलूखलाश्मकुट्टो वा दन्तोलूखल एव वा ॥५॥
अगीस्तव पाका आलीं । कां काळें जीं परिपक्व झालीं ।
तीं तापसालागीं भलीं । आहारीं विहिलीं उदरार्थ ॥२९॥
दांत असलिया बळी । फळें खावी तेणें सगळीं ।
कां गेलिया दांत समूळीं । कांडूनि उखळीं सुखे खावीं ॥३०॥
जरी उखळ न मीळे वनीं । तरी खावीं दगडें ठेंचुनी ।
नाहीं चाड गोडपणीं । क्षुधानिवारणीं आहारार्थ ॥३१॥