मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अठरावा|

एकनाथी भागवत - श्लोक १३ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


इष्ट्वा यथोपदेशं मां दत्वा सर्वस्वमॄत्विजे ।

अग्नीन्स्वप्राण आवेश्य निरपेक्षः परिव्रजेत् ॥१३॥

अष्टश्राद्धादि विधान । प्राजापत्यनामिष्टिसाधन ।

मज भगवंतातें यजून । सर्वस्वदान ऋत्विजां ॥६७॥

मुख्यत्वें मूर्त जो अग्नी । तो निजहृदयीं संस्थापूनी ।

आशा निःशेष छेदूनी । संन्यास करूनी निरपेक्ष ॥६८॥

संन्यास करितेठायीं । विघ्नें अपार उठतीं पाहीं ।

तीं रगडूनियां पायीं । संन्यास तिंहीं करावा ॥६९॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP