वन्यैश्चरुपुरोडाशैर्निर्वपेत्कालचोदितान् ।
न तु श्रौतेन पशुना मां यजेत वनाश्रमी ॥७॥
जो वानप्रस्थ स्त्रीसमवेत । त्यासी अग्निहोत्र झालें प्राप्त ।
तेव्हां कर्म जें वेदोक्त । तें करावें समस्त वनवासीं ॥३८॥
वनीं जीं फळें ज्या ऋतूस । तोचि कल्पावा चरुपुरोडाश ।
तेणें यजावा मी यज्ञपुरुष । सावकाश मंत्रोक्त ॥३९॥
यापरी श्रौतकर्मविधान । यागार्थ पशुहनन ।
तें वानप्रस्थासी नाहीं जाण । वनफळीं यजन यागाचें ॥४०॥