मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अठरावा|

एकनाथी भागवत - श्लोक ४५ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


भक्त्योद्धवानपायिन्या सर्वलोकमहेश्वरम् ।

सर्वोत्पत्त्यप्ययं ब्रह्म कारणं मोपयति सः ॥४५॥

सकळ सच्चिदानंदस्थिती । जीमाजीं सांपडे मी सहजगती ।

ती नांव माझी `परमभक्ती' । जाण निश्चितीं उद्धवा ॥२६॥

विपरीत संसाराचें भान । दिसे दृष्य-विलक्षण ।

तेथ सदा स्वानंदपूर्ण । ते चौथी जाण भक्ती माझी ॥२७॥

जेथ देव भक्त एक होती । एकपणें भजनस्थिती ।

ऐशी साधकांसी प्राप्ती । ते `परमभक्ती' उद्धवा ॥२८॥

माझी प्रकटल्या परम भक्ती । पतन नाहीं प्रळयांतीं ।

साधक मद्‌रूपा येती । स्वरूपस्थितीं समसाम्यें ॥२९॥

त्या स्वरूपाचें लक्षण । सांगताहे श्रीनारायण ।

उत्पत्ति-स्थिति-निदान । कारणा जो चिदात्मा ॥३३०॥

जो सकळ नियंता ईश्वरु । जो विश्वात्मा विश्वंभरु ।

जो उपनिषदांचें सारु । जो महेश्वरु जगाचा ॥३१॥

त्या पदाची पदप्राप्ती । भक्त पावले परमभक्तीं ।

तेंचि पुढती उद्धवाप्रती । स्वानंदें श्रीपति सांगत ॥३२॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP