इति मां यः स्वधर्मेण भजेन्नित्यमनन्यभाक् ।
सर्वभूतेषु मद्भावो मद्भक्तिं विन्दतेऽदृढाम् ॥४४॥
सर्व भावें अनन्यगतीं । करितां स्वधर्में माझी भक्ती ।
माझा भावो सर्वांभूतीं । शीघ्रगती उल्हासे ॥२३॥
मद्भावो जोडल्या सर्व भूतीं । तेणें प्रकटे माझी चौथी भक्ती ।
जिच्या पायीं चारी मुक्ती । सदा लागती स्वानंदें ॥२४॥
अनिवार अनन्यगती । सर्वस्वें ज्यासी माझी प्रीती ।
तो लाहे माझी परमभक्ती । जेथोनि कल्पांतीं च्यवेना ॥२५॥