|
न. १ गाय , म्हैस , बैल वगैरेची विष्टा , पुरीष . २ फळें , फुले , पानें कुजून गोळा झाली म्हणजे त्यांस म्हणतात . - स्त्री . १ शेणी ; गोवरी ; वाळलेला शेणाचा पोहो . २ ( बे . ) गुळाची ढेप . [ सं . शकृत् ; शकन् ; तृ . शक्ना ; प्रा . छाण ; गु . छाण ; सिं . छेणु ; छेणो ; सं . छगण - शगण - शअण - शाण - श्याण - शेण . - रा . ग्रंथमाला ] म्ह ० पडलेले शेण माती घेऊन उठते . शेण खाणे - मूर्खपणाचे , निष्फळ , भलतेच कृत्य करणे . केळे खाणे पहा . मग शेण खायला मला कशाला आणले ? - नामना २१ . शेणाचा दिवा लावणे - दिवाळे काढणे . शेणई - पु . शेणवी पहा . शेणकई , शेण्काई , शेणकी , शेणखई , शेणखाई - स्त्री . १ शेण टाकण्याकरितां केलेली खांच , खाडडा ; उकिरडा . २ ( देशावर ) शेणाची रास , ढीग . शेणकला , शेणकाला - पु . शेणखळा पहा . ०कुंडा पु. ( राजा . ) घरधंदा ; घरकाम ; रोजचे व्यवहारांतील शेण्गोठा करणे , झाडणे , सारवणे , दळणे , कांडणे वगैरे काम . ०कूट कूर - न . १ गोवरीचा तुकडा ; शेणीचा तुकडा . २ वाळलेल्या शेणाचे तुकडे , चुरा वगैरे ; गोवर . ०कूर न. शेणगोठा पहा . ०कोंडा पु. शेणांत भाताचें तूस किंवा कोंडा घालून लावलेल्या गोवर्या . ०खंड खुंड - न . शेणकूट ; गोवरी ; गोवर . ०खळा पु. १ सारविण्याकरितां पाणी घालून कालविलेले शेण . २ फळे , पाने , फुले कुजून , नासून जो गोळा होतो तो . ०खळी खाई - स्त्री . शेणकई पहा . ०खुंड न. १ गोवरीचे खांड ; गोवर . - पु . २ ( ल . ) ( निंदार्थी ) शेणवी . ०गंड पु. ( निंदार्थी ) शेणवी . ०गाईर स्त्री. ( राजा . ) शेणकई . ०गोटा पु. १ शेण ( सामान्यतः ). २ शेणाने सारवणे , झाडलोट वगैरे कामांस योजावयाचा सामान्य शब्द . यासारखेच शेणशेणकूर , सडासंमार्जन , सडासारवण , वारासार , झाडलोट , चूलपोतेरे , शेणपाणी , शेणसडा इत्यादि शब्द व्यापक अर्थाने योजिले जातात . ०गोठा पु. गुरांच्या गोठयासंबंधी सामान्य कामांचा दिग्दर्शक शब्द ; शेण काढणे , झाडणे , गोठा साफ करणे इत्यादि कामें ; गोठापाणी . ०गोळा पु. १ खरकटयावर लावण्याकरितां किंवा इतर कामांकरितां घेतलेला शेणाचा गोळा ; शेणाचा लगदा . शेणगोळे घालणें - अव्यवस्थितपणें केलेले काम तपासून दुरुस्त करणे . शेणणें - अक्रि . १ शेण टाकणे ; हगणे ; लेंडी टाकणे . २ डोळ्यांस पू येणे ; चिपडे येणे . ०थापणारा पु. आळशी , निरुपयोगी , रिकामटेकडा मनुष्य ; नाकर्ता , नपूंसक मनुष्य ; षंढ . ०दिवा पु. दिवाळखोरीचा शेणदिवाच लावणे होय . - के २० . ९ . ३० . शेणप - पु . ( कों . ) शेणकला , शेणखळा पहा . शेणपा , शेणपोह , शेणपोहो , शेणपोव , शेणाचा पोहो - पु . १ शेणाचा गोळा , लगदा ; पोहो ; एका वेळी जनावराने केलेली विष्टा . २ ( ल . ) लठठ परंतु दुर्बल , जड , मद्दड जनावर ; दुर्बल , नाकर्ता , नालायक मनुष्य ; षंढ ; नपूंसक . ०पाटी स्त्री. शेण वाहून नेण्याची टोपली . ०पाणी न. १ शेणखळा ; पाण्यांत कालविलेले शेण . २ शेणगोटा , सडासंमार्जन वगैरे घरगुती कामासंबंधी व्यापक अर्थाने योजावयाचा शब्द ; गोठापाणी . ०पुजा स्त्री. शेणमार पहा . ०पुंजा पु. १ शेणगोळा करणारा इसम . २ शेणगोळ्यासारखा मनुष्य ; हलक्या दर्जाचा मनुष्य ; नीच , हलकट मनुष्य . पुंजी - स्त्री . गोवर्या लावणारी स्त्री ; हलकट नीच स्त्री . ०पुडी स्त्री. वाळलेल्या शेणाचे तुकडे , चूर ; गोवर . ०पोतेरें न. शेणखळ्याच्या बोळ्याने जमीन सारवणे . ( क्रि० करणे ). ०भोवर पु. शेणकिडा ; शेणावरील माशी ; शेणावरील भुंगा . [ सं . शेण + भ्रमर ] ०माती स्त्री. ( ना . ) १ धुलवड . ०मार पु. एखाद्याची अप्रतिष्ठा व्हावी म्हणून त्यावर केलेला शेण , चिखल इत्यादिकांचा मारा . शेणवड - स्त्री . ( को .) १ धुळवड ; शेण , माती वगैरे फेकणे , मारणे . २ धुळवडीच्या दिवशी एकमेकांवर फेकण्याकरितां केलेली शेण , माती वगैरेची राड , गारा . शेणवडणे - अक्रि . शेणवड करणे . शेणवणी - न . शेण कालविलेले पाणी . शेणविरणें - अक्रि . राब करण्यासाठी शेतांत शेण पसरणे . ०सडा पु. १ पाण्यांत शेण कालवून तें जमिनीवर शिंपणे , उडविणे . ( क्रि० टाकणे ). २ फळे , फुले , पाने कुजून त्यांचा झालेला गोळा ; शेणखळा . ३ गर्दीमध्ये माणसांवर उडविलेली फुले , पैसे , कवडया वगैरे जमीनीवर पडून पसरलेली दिसतात तो . ४ लढाईमध्ये भयंकर कत्तल झाल्यामुळे जमीनीवर सांडलेला रक्ताचा स्त्राव , मांसाचे छिन्नभिन्न तुकडे वगैरे . त्या अडचणीत पाचशे मनुष्ये ठार झाली , तैशीच घोडीहि पडली , तैसेच जखमीहि झाले , केवळ शेणसडा होऊन गेला . - भाब ७९ . केला शेणसडा त्याच्या फौजेचा । - गापो . ३ ०साऊळ स्त्री. पोकळीची अळी खणून तिच्या मुळाशी शेण घालतात तें . ०सूप न. शेण भरून टाकण्याचे सूप , शिपतर . शेणाडी - स्त्री . शेणकई . शेणामेणाचा - वि . दुर्बल ; निःसत्व ; अशक्त ; हलका ; पोकळ ; वरपांगी ; लिबलिबीत ; मऊ , सोपा वगैरे ( इमारत , वस्तु , धंदा , प्राणी , मनुष्य यांच्या बाबतीत . ) तिरस्कार , उपेक्षा दाखविण्याकरितां योजतात . दिवसेदिवस शेणामेणाचे ते लोखंडाचे होत चालले . - भाव ५९ . शेणामेणा लोखंडाचा - वि . प्रथम फारच दुर्बल , शिथिल परंतु नंतर कांहीसा दृढ , त्यानंतर फारच दृढ असा ( व्यवहार , भाषण वगैरे ). शेणार काढप - ( गो . ) जमीनदोस्त करणे ; नुकसान करणे . शेणारा - पु . गोवर्यांचा लिंपलेला ढीग , रास . शेणी - स्त्री . १ गोवरी ; थाबडा ; शेणाचा वाळविलेला गोळा . २ शेणाचे वाळलेले पोहो ( अव .) नामयाची जनीसवे वेची शेणी । - तुगा ३६९१ . ३ अग्निहोत्राने होमाकरितां शेणाचे वाळविलेले गोळे . ४ ( राजा . ) ( सांकेतिक ) दुंडा पैसा ; ढबू पैसा . वर शेणी रचणे - जाळणे ; नाहिसे करणे लोकलाजेवरी रचिल्या शेणी । - मध्व २२८ . ०पाणी न. सडा घालणे , शेण्या घालणे , पाणी आणणे वगैरे काम . ( क्रि० करणे ). शेण्या - पु . शेणाचा पोहो . - वि . डोळे आले असतां कमी खुपतो पण पू बाहेर येतो त्या विकारास म्हणतात . शेण्या खैर - पु . खैर झाडाची एक जात . शेण्या साप - पु . एक काळा विषारी साप .
|