भानुदासांचे अभंग
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
१.
रायें कंठमाळ देवासी घातली । देवें ती दीधली भानुदासा ॥
कोणी नेली माळ करिती त्याचा शोध । देखिली प्रसिद्ध याचे गळां ॥
राजदूती नेला म्हणती गा हा चोर । रायानें विचार नाहीं केला ॥
सुळीं द्यावयासी ‘भानुदास’ नेला । त्यानें आठविला पांडुरंग ॥
२.
फ़्कोरडिया काष्टीं अंकुर फुटले । येणें येथें झालें विठोबाचें ॥
समर्थाचा आम्ही धरिला आधार । तरीच सत्वर आला येथें ॥
माझिये संकटीं आलासि धाऊनि । ‘भानुदास’ चरणीं लागतसे ॥
N/A
References : N/A
Last Updated : April 05, 2015
TOP