मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
विसोबा खेचर

विसोबा खेचर

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


पर्वतप्राय पापराशी होती दग्ध । वाचेसी मुकुंद उच्चारितां ॥१॥
अच्युत श्रीहरी केशव नरहरि । माधव हरहरी रामकृष्ण ॥२॥
नामासी साधन करिशील पूर्ण । तें प्रपंचाचें भान उरों नेदी ॥३॥
उदासीन वृत्ति आचरावें कर्म । नाहीं देहधर्म गुण माया ॥४॥
ऐसा हा अनकलित मार्ग साधेल तुज । खेचर विसा गुज सांगे नाम्या ॥५॥

खेचरी धरिली माव । लिंगावरी ठेविला पाव । पहावया भाव । नामयाचा ॥१॥
नामा तेथें आला । देव नमस्कारिला । देखोन बोलला । वचन त्यासी ॥२॥
लिंगावरी चरण ठेविले । काढा जी वहिले । दिसतां वरी भले । करणी न कळे ॥३॥
तंव येरू बोलिला। नाम्या तूं भला । मज नाहीं कळला । देव तुझा ॥४॥
जेथें नाहीं देव । तेथें ठेवी पाव । सर्वत्र सदैव । तूंचि  असशी ॥५॥
मीपणी भुललों पाही । मजन कळेचि कांहीं । देव नसे ते ठायीं । पाय ठेवीं ॥६॥
तंव नामा विचारी । शब्दाची कुसरी । पहातां निर्धारी । सान नोहे ॥७॥
देवाविण ठाव । हें बोलेणेची वाव । परतोनि संदेह । पडला मज ॥८॥
आपुलें उमाणें । आपण उमगावें । मजसी तारावें । भवसागरीं ॥९॥
नामा धरी चरण । अगाध तुमचें ज्ञान । आपुलें नाम कोण । सांगा स्वामी ॥१०॥
येरू म्हणे तंव । खेचर विसा पैं जाण । लौकिंकी मिरविणे । अरे नाम्या ॥११॥
नाम आणि रूप । दोन्ही जया नाहीं । तोचि देव पाही । येर मिथ्या ॥१२॥
जळ स्थळ आणि । काष्ट हे पाषाण । पिंड ब्रम्हांड व्यापून । अणुरेणु ॥१३॥
सर्वत्र साक्षीभूत । हें जाणोनि पाहत । खेचर म्हणे नाम्यांत । अवधा देव ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 07, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP