पंडित नारायण व्यास बहाळिये
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
भवभुजंगें दिठी । पाडीलेया कव्हणीही नुठी ।
मंत्रेंतंत्रेंविणें सृष्टी । निजद्दष्टीवांचौनियां ॥
सकल मंगल पावना । सकळ जीवाचेया जीवना ।
परसुखाचें साधन । क्रिया अवलोकन तुझें देवा ॥
जयजय परमेश्वरा परात्परा । परात्परा परब्रम्हा ।
जयजय कैवल्यदानी । प्राकृत वाचा ॥
काई जीउनी बाहाळेया । नारायणा स्वामी ।
पुनर्भवापासौनि । राखैं देवा ॥
जें आर्तासि कारणें । संसारश्रमाचें विसंबणें ।
तें श्रीऋद्धिपुर देखिलें तेणें । दुरौनियां ॥
सासुरवासें शीणली । तिये भेटे जेंवी माउली ।
असो हे तैसी परी जाली । श्रीऋद्धिपुर देखिलेआ ॥
ढांडोळितां तीनि लोकां । मी उपमा न देखें आणिका ।
जें जालें जगदेकनायका । क्रीडास्थानु ॥
N/A
References : N/A
Last Updated : April 07, 2015
TOP