मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
विठ्ठल चित्रकवि

विठ्ठल चित्रकवि

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


अद्यापि ते कनकचंपकवर्णगौरी ।
उत्फुल्ल पद्मनयना तनुरोमहारी ॥
सुप्तोत्थिताच शयनीं मदविव्हलांगी ।
विद्या जशी गति तशी स्मरतों प्रसंगीं ॥१॥

अद्यापि चंद्रवदना नवयौवनांगी ।
पीनस्तनी मजपुढें उभि हेमरंगी ॥
माझी तनू स्मरशरें पिडितांचि वेगीं ॥
गात्रें सुशीतल करी सुरतप्रसंगीं ॥२॥

अद्यापि ते शरदपुष्पदलायताक्षी ।
वक्षोज वर्तुलघटद्वय मी निरीक्षीं ॥
आलिंगिता सुरस घे मधुराधराचा ।
जैसा मिलिंद रस घे नवपंकजाचा ॥३॥

अद्यापि नाक्लमतनू तिचि तेजराशी ।
चुंबावया रुळत कुंतल गंडदेशीं ॥
तें वारितां ध्वनि उठे करकंकणाची ।
तेणेंकरोनि मुरकुंडि वळे मनाची ॥४॥

अद्यापि तें सुरतजागरघूर्णमानें ।
वक्रा विलोकन करी सुरताभिमानें ॥
शॄंगारसारनलिनी गजराजगामी ।
सल्लज नम्रवदना शयनीं स्मरें मी ॥५॥

अद्यापि ते मदनमंजिरि वैजयंती ।
म्यां देखिली विरहव्याकुल मध्यरातीं ॥
आलिंगिली करलता पसरोनि तीसी ।
सर्वास्मना विसर तो न पडो मनासी ॥६॥

प्रणमित जगदंबे कल्पवल्लीकदंबे ।
कवि तुज न विसंबे प्रेम पोटीं झळंबे ॥
मजवरि जरि अंबे त्वत्कृपाद्दष्टि तिंबे ।
तरि रस अविलेबें काव्यसाहित्य बिंबे ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP