मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
विठ्ठल चित्रकवि

विठ्ठल चित्रकवि

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


मेरूचा खचला कडा तडकला भूगोल ढांसाळला ।
सूर्याचे रथिचा तुरंग कचला ऐसा निधा दाटला ॥
नेणों मेघ गडाडिला समय तो लंकेश्वरा वर्तला ।
सीतामानस फार तांडव नटें नाचे महा हर्षला ॥४९॥

टाळी एकचि पीटिली जनपदीं पौरांना हांसती ।
झालासे कलका महा गलबला नादें दिशा घूमती ॥
सीता हास्य करीतसे गदगदां भीती प्रभू अंतरीं ।
झालें विन्घ विटंबिलें सखि म्हणे श्रीरामचंद्रा वरीं ॥५०॥

जैसें वज्र हिमालयावरी पडे कोदंड तैशापरी ।
भारें रावण खालता दडपला मुद्रा जडे खेचरी ॥
तोंडीं रक्तहि धूलि त्यांत भरली आरक्त झाली तनू ।
चक्रन्याय उरोदरावरि फिरे वज्रोपमात तें धनू ॥५१॥

ज्या चापें त्रिपुरें विशाळ नगरें निर्दाळिली शंकरें ।
तें क्रोधें करिं घेऊनी उचलितां दुर्विन्घ झाली पुरें ।
रक्ताच्या उलट्या वमे भडभडां प्राणांत आरंभिला ।
तेव्हां त्या जवळी प्रधान निखरा देखोनि धाविन्नला ॥५२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP