मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
मुक्तेश्वरांची कविता

मुक्तेश्वरांची कविता

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


“प्रकृत कवींचा वाग्जल्प । तैलकढईंत पाहूनि रूप ।
फिरतां मत्स्य सकंप । वामनेत्रीं विंधिला ॥
परी तें मूळ भारतीं नाहीं । म्हणोनि असो न बोलों कांहीं ।
नळिकाछिद्रांतूनि पाहीं । यंत्र भेदोनि पाडिलें ॥

द्रुपदें दिधलें बहु आंदण । कृष्णें धाडिलें उपायन ।
हें ऐकोनि दुर्योंधन । हृदय पिटी हस्तकें ॥
कर्ण झाला अतिविवर्ण । म्हणे हें विधीचें करणें कोण ?।
शकुनि म्हणे गेला प्राण । आलें मरण रोकडें ॥
दु:शासन मोकली धाय । म्हणे गेले हातपाय ।
आतां विचार करणें काय । तो तत्काळचि विचारा ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP