रमावल्लभदास
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
“गेलों गृहा जैं श्रुतदेवाच्या । तैं उल्हासल्या वृत्ति त्याच्या ।
मग केल्या तेणें नेसत्या शिरींच्या । ते अंगोस्याच्या गुढिया छत्रें ॥
वाम करें एक उभवी । सव्य करें एक फिरवी ।
नामोच्चार जगा करवी । जय जय वदवी जयदेव ॥
न कळे जगीं जग आहे । न कळे मग मी कवळीं बाहें ।
न कळें सावध म्हणताहें । मुनिजना हें टक राया ॥
मग तो सावध होऊनि । जळ फुकाचें करीं लाहूनि ।
सन्मुख उभा राहूनि । उपचार कल्पुनि सांडित ॥
तें जळ म्यां प्रीतीनें प्राशिलें । जेंवी मिष्टान्न भक्षी क्षुधे त्रासिलें ।
तैसें मज तेणें उल्हासिलें । हें देखिलें श्रीशुकादिकीं ॥
भाविकीं मज जें जें समर्पावें । तें तें म्यां घडी घडी स्मरावें ।
दांभिकीं जें जें करावें । तें तें विसरावें समूळ म्यां ॥
तरी अर्जुना सकळ विसरावें । एक मत्प्रीतीस धरावें ।
मत्प्रीतीनें जें करावें । तें त म्हणावें आराधन ॥
पत्र पुष्प फळ जळ । इतुकाच पुरे भजनमार्ग केवळ ।
माझाच झाला जो प्रेमळ । माझें सकळ हें त्याचें ॥
तो म्हणेल देवालय नाहीं । मी म्हणे वैकुंठ तुझेंचि पाहीं ।
तो म्हणे देवा शय्या नाहीं । मी म्हणेन राहीन शेषांकीं ॥
तो म्हणे देवा अलंकार । मी म्हण हा तुझाच शृंगार ।
एवं माझ्या शरीराचा आकार । हाही साचार भक्तांचा ॥
भक्त म्हणतील तूं कोण हरी । मी तुमचाच देहो म्हणेन तरी ।
पुसतील जरी याहीवरी । तरी ते परी मुक्याची ॥
N/A
References : N/A
Last Updated : April 05, 2015
TOP