मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
शिव कल्याण

शिव कल्याण

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


राजा राज्यपद पावला । छत्रचामरेंसीं विराजला ।
परी राजाज्ञेसी नाहीं जाला । विस्तार जगीं ॥
आज्ञा जैं थोटावली । तैं राज्यपदवी हिणावली ।
म्हणोनि जागामाजी मोकळी । वर्तली पाहिजे ॥
तेवी चोजवलिया आत्मखूण । परि तेंचि सरळ द्दष्टीविण ।
सुखाचा फुंज जाण । नुतरे देखा ॥
तें आत्मद्दष्टीसमोर । कांहीं नसावा हीर ।
विरोधाची कोर । उल्लंघून जावें ॥
किंवा आत्मकळेचे ठायीं । विरोधासीच जन्म नाहीं ।
म्हणोनि तिये द्दष्टीसी कांहीं । अंतरावोचि नसे ॥
तो स्वात्मानुभव रावो उदैला । तैं अंतराय तस्कराचा ठावो पुरिला ।
ऐसें नव्हतां जाला । प्रत्ययोचि हीनु ॥
अहो राज्यपदवी जो पावे । तेणें विरोधी चोजवावे ।
नाहीं तरी असावें । स्वाभविक सुखें ॥
तिये काळांतरी घडे । अंतराय त्यासी ॥
हें बहु काय बोलावें । जाणिवेवरी न जावें ।
जालेपणाचेनि नांवें । कैवल्यही नको ॥
मज एकासी प्रत्ययो जाला । येरू अज्ञानें असे नाशिला ।
हा जयाचा न उतरला । अहंकार सापु ॥
बोले प्रज्ञेचीं उत्तरें । कवळिला आहे अहंकार अजगरें ।
जयाचें लाधलेपणाचें वारें । गेलेंचि नाहीं ॥
ना तरी आम्ही जालों ब्रम्हाज्ञानी । एकात्मता अवघी जनीं ।
म्हणोनि यच्चावच्च करणी । संपादूं लागे ।
अथवा आम्ही ब्रम्हाज्ञानी । येर विश्व अवधें अज्ञानी ।
म्हणोनि जनांचा झणी । स्पर्श होईल ॥
आम्ही ब्रम्हाविद ब्राम्हाण । येर चांडाळ कीं अवघे जन ।
ऐसें जयाचें ज्ञान । हुंबत असे ॥
एवं दोहींही परी जाण  । लाधली नाहीं खूण ।
एवं सरळ द्दष्टीवीण । न जोडे शांति ॥
ना तरी लाधलिया अवसान । विसर्जावें कर्माचरण ।
अहो या वाक्याचा अर्थ जाण । न कळेचि तया ॥
कां जे कर्मासि सांडों जातां । तत्काळ जाला कर्ता ।
एवं आत्मखुणेसी नेणतां । मनोरथ करिती ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP