मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
मुक्तेश्वरांची कविता

मुक्तेश्वरांची कविता

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


“हें देखोनि दुर्योधन । गुरुसि बोले परिहारवचन ।
त्रिविधयोगें श्रेष्ठपण । पुरुषालागीं बोलिजे ॥
जातिकुळें नामाथिला । तो एक श्रेष्ठत्वें मानिला ।
एक विद्येनें पूज्य झाला । सेनाबळे पैं एक ॥
धनुर्वेद विद्यागुरु । उपमे कार्तवीर्य अपरू ।
ऐसियाचा अनादरू । केंवीं चतुरीं करावा ! ॥
क्षात्रधर्मीं आगळा सृष्टी । तो केंवी पहावा हळवट हृष्टीं ।
तुम्हां सुज्ञांच्या गोष्टी । नवले वाटे ऐकतां ॥”
“आर्द्रशीर बद्धपाणि । भाळ ठेवी पितयाचरणीं ।
येरें आलिंगितां नयनीं । आनंदाश्रु लोटले ॥
अवघ्राण करितां मस्तक । चक्षुघटी स्रवलें उदक ।
केला दुसरा अभिषेक । ऐसें वाटे समस्तां ॥
“धीर न धरवे भीमसेना । म्हणे ‘रे सूताचिया नंदना ।
वर्णोत्तम ऐसी संज्ञा । आजि कळली आमुतें ॥
चित्त न घालोनि क्षात्रधर्मीं । हातीं धरोनि प्रतोदरश्मि ।
दासभावें दासधर्मीं । रथसारथ्य करावें ॥
अर्जुंनाशीं द्वंद्वयुद्ध । करूं पाहसी बुद्धिमंद ।
जेवीं कां डोळसासी अंध । पैज घाली लपावया ॥
अंगदेश राज्यासनीं । योग्य नव्हेसी अधमवर्णी ।
श्वान जवळा महायज्ञीं । पुरोडाश लाभेना ॥”

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP