दासोपंत ओंव्या
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
अवघेन राज्यें जोडती । पुत्रपौत्र तेचि येती ।
नाना भलयति येकि प्राप्ति । सांग तेणें ? ॥५९॥
अवघे स्वजन मारावे । मग तें कोणाकारणें करावे ? ।
पुरत्रयीचें अवघें । भौपत्य जें कां ॥६०॥
समूळ कर्ण छेदूनि । कुंडलें घालावीं कवणें स्थानीं ? ।
जडितें मोलाचीं पाहोनि । काये काज ? ॥६१॥
अंगुलिका छेदूनि सकळा । मुद्रिका घेतलिया गोपाळा ।
आतां ते माळ गळां । करूनि घालावी ? ॥६२॥
नाशिकेवीण मुक्ताफळ । कामिणी घालिती केवळ ।
तैसें माझें राज्य विकळ । स्वजनेवीण ॥६३॥
बोडिकें डोकें शिरीं खोपा । तैंसे मज झालें वापा ! ।
शिरेंवीण पाहें पा । भार्णचि नये ॥६४॥
द्दष्टीवीण सुलोचन । प्राणहीनाचें भृषण ।
तैसें कौरवहीन जाण । माझें राज्य ॥६५॥
धोटीं घातलिया वेळा । मरोनि भोगणें सोहोळा ।
असो तें राज्यचि गोपाळा । काये करावें ? ॥२२६६॥
N/A
References : N/A
Last Updated : April 05, 2015
TOP