मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
पंडित विश्वनाथ बाळापूरकर

पंडित विश्वनाथ बाळापूरकर

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


अमानित्व तो केलियावरी त्याग । बाणें देहीं संन्यास योग ।
तेणें सानुकूल जग । महत्तत्वें मानी ॥
ऐसा सन्मान्यतेचें सुख पडे । तेणें विषोचि सेविलें घडे ।
यालागीं चिन्हालागीं लपोनी दडे । दीनत्वामाजीं ॥
मग विषयमूळ मान्यता । तेथेंहि विरमता ।
भरोनि भावी चिंता । अमानत्वें ॥
तों मानाचेनी भारें दडपे । पूजे तें भिऊनि कांपे ।
पुरस्करलिया वासिपे । वर्में जेवीं ॥
रूपकीर्तिचेनि नांवें । वोसावे श्रवणासवें ।
कोमाउनी जाय गौरवें । जीवें आंगे ॥
जन अव्हेराची करी आस । पाहे अवज्ञे येउती वास ।
धिक्करण याची बहुवस । चाड जेंवी ॥
भणंग बुद्धी बोभाइले । ते वेळीं ऐसें होते जाले ॥
भणे अजि येणे संपादिलें । परम सुख ॥
म्हणोनि रंकवृत्तीचिये खोपे । जो महिमा भेणें लपे ।
तैं अमानित्व आरोपे । तेया अंगीं ॥
आतां मान्यता बीजाचा कोंभू । तैं निपटुनि मोडे दंभू ॥
उपाधित्यागारंभू । मांडितसाता ॥
अवाच्यतेचा कृपीं । अभ्यासली सामग्री लोपी ।
आथिले गुण निक्षेपी । अकर्तेपणामाजीं ॥
जडत्वाचीं आंग भूषणें । वेडिवंतेचीं मिरवणें ।
उन्मत्तावत बोलणें । विचरे पिशाच्चवत ॥
येरव्हीं तयाचेनि पाडें । सिहाणा कुशलू न जोडे ।
चातुर्य असौनि फुडें । क्रीदे बालवत ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 07, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP