मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
महेश्वरपंडित

महेश्वरपंडित

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


“॥ श्री आनंदमूर्तयेनम: ॥

जो हेमवर्णी सारिखा । नमन करूं इति मुनि वेखा ।
जो न वर्णवे सेखादिकां । सहस्रमुखीं ॥
वेद जयाचे नागारी । वर्णितां गुणलावण्याची थोरी ।
श्रमले तयाचि परी । नेणती म्हणोनी ॥
श्रुतींवरी रचिलीं पुराणें । तें बोलों नेणती अज्ञानें ।
भांबावली षट दर्शनें । जयासि पाहतां ॥
अज्ञानाचेनि प्रसादें । आगम दुरि राहिले विसंवादें ।
ननु वादितीचि उपनिषदें । भूलिकीं जालीं ॥
ऐसा षटप्रमाणीं अगोचरू । श्रुती नव्हेचि निर्धारू ।
तो नमस्कारिका श्रीचक्रधरू । मुनी महेश्वरीं ॥
प्रभुचेनि नाम प्रसादिकें । देवा आळविती कवतिकें ।
तया नागार्जुनासि मी अमृत सुखें । नमस्कारीन ॥

प्रथम चरणीं कळी । जंबुद्वीप वैदर्भकुळीं ।
अवतरली मूर्ति घन:शाम सांवळी । परब्रम्हा वस्तु ॥
वैदर्भकुळीं मातुलग्रामु । तेथ अवतरला आत्मारामु ।
फेडावया भवश्रमु । जीव जातांचा ॥
याज्ञवल्की ऋषीश्वरू । प्रथम शाखे अवतरला ईश्वरू ।
मेघ:शाम मनोहरू । मायावेषें ॥
सप्तवर्षां व्रतबंधन । द्धादश वर्षीं वेदपठण ।
यावरी मायावेषू नटण । आदिपुरुषाचें ॥

जी तुमचेनिपसायदानें । ऋद्धिपुरमाहात्म्य अनुसंधानें ।
वोवुनि पुराण प्रबंधरत्नें । पदीं प्रमेयाचा ॥
जी तें परावाणीचेनि बोलें । मुनी नागदेवी अनुवादिन्नलें ।
तुम्हां रुचैल तर्‍ही भलें । स्वीकारिजो कां ॥
तेणें न करुनियां सलगी  । तुम्हां संतांसी केली चांगी ।
प्रसाद पसावो योग्ये । म्हणौनि ॥
जी मी अमंगळु ऐसा । निर्‍हा पा पाहों नये हा भरंवसा ।
सावधा द्याल हा धिंवसा । उबन्नला मज ॥
तर्‍ही मीबडबडैला भलते उती । तें उपसाहावें संतीं ।
जैसें बाल घास सुये आपुलां हातीं । पित्यामुखीं ॥
परि हें देवाचें स्तवन । सलगी केलें अनुवादन ।
तें उपसाहावें तुम्ही संतजन । म्हणे महेश्वरू ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 07, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP