मुक्तेश्वरांची कविता
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
वनिता मनोरम एकांतीं । आपण होऊनि पुरुषा प्रार्थीं ।
तेथें जो निर्विकल्प चित्तीं । तोचि शंकर म्हणों ये ॥
विजनीं भरलीं कनकें पाहें । देखिल्यावरी लोटी पायें ।
ऐशी निर्लौंभता लाहे । तोचि शंकर म्हणों ये ॥
जया आधीन मन इंद्रियें । न मनी सुखदु:खाचे घाय ।
छळितांही परक्रोधा नये । तोचि शंकर म्हणो ये ॥
जिहीं आपुल्या सर्व यत्नें । पराचें क्लेश परिहरणें ।
श्रमोनि पुढिल्या सुख दावणे । तो एक धन्य संसारीं ॥
प्रेरणा न करितां संकटीं । कृपेनें अनाथ घाली पोटीं ।
केला उपकार न बोले ओंठीं । तो एक धन्य पुरुष ॥
आपुल्या समान पुढिल्या पाहे । पराच्या संतोषें संतोष आहे ।
अन्य केल्शे क्लेशत जाये । त एकधन्य संसारीं ॥
राजा कोपी तपस्वी साधु । बळ प्रतिष्ठित प्रसिद्धु ।
इहीं करितां विनोदु । परतोन शहाणे न करिती ।
N/A
References : N/A
Last Updated : April 06, 2015
TOP