ऐसे प्रतिभाषे वेगळाले । घट असती नामाथिले ।
एके संस्कृतें सर्व कळे । ऐसें कैसेन ? ॥७७॥
सनवट, चोपणा, गव्हाळी । चिकणी पन्हवट मळी ।
चुनवट, माळवट खळी । स्वळगा खात ॥७७॥
उतें, गोटल. खडाळ । पांढरी, सेडु मुरुबाळ ।
तांबट, काळी करळ, । भेद मृत्तिकेचे ॥७८॥
नदु, नदी, ओहळ, । झोती, जिरपें खलाळ ।
धार, घाळणी, पीळ । भंवरा धोधें ॥७९॥
टांकें, बाबी, पोखरणी । बारव, विहिरी, अडु धरणी ।
विहिरा, तळें, रानीं, । हळता धुमे ॥८०॥
ऐसे भेद जळस्थानांचे । एक एक बहुतां नामाचे ।
सारी प्रयोजन तयांचें । संस्कृत कैसें ? ॥८१॥
“न पाहे श्रोतयांचें वदन । न करी भाष्याधारें विवरण ।
स्वानुभवें हें मनन । म्हणौनि संपादीं ॥११९॥
आइकैल तेणें आयिकावें । मानैल तेणें घ्यावें ।
नावडे तेणें नेघावें । दोन्ही श्रवणीं ॥२०॥
स्वसंप्रदायिक जे जोगी । यया मननाचे विभागी ।
टीका ही तयांचि जोगी । तेंही आइकावी ॥२१॥
स्वानुभवचि येथीचें प्रमाण । स्वानुभव हेंचि साधन ।
अन्यत्र शास्त्रश्रवण । तैसें हें नव्हे ॥२२॥
प्राकृत म्हणौनि दूषिती । तेचि यया ज्ञाना वंचती ।
भाषाचि केवळ भजती । ते मूर्ख कीं ना ? ॥२३॥
हातीं देतां नवरलें । मर्हाठेन बोलें न घेणें ।
आतां हानि तया कारणें । ते दूरि नसे ॥२४॥
संस्कृतें बोलिलें सेवणें । तेंचि सांडावें प्राकृत वचनें ।
ऐसिया मूर्खा मुंडणें । किती आतां ? ॥२५॥”