दासोपंत पद (दादरा)
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
खेर - खदिर, सर्प - संगती घडलीसे, चंदना ! रे ! ॥
पासीं लसनराशि, कें गुणें उरसी चंदना ! रे ! ॥
हृदय कठिण करीं, परगुण न धरीं चंदना ! रे ! ॥
गुणा भुलसी तरी पडसील बोहरि चंदना ! र ! ॥१॥
ध्रु० ॥ अरे रे रे रे रे रे ! परिस तूं, सज्जना रे ॥
खळसंगु असतां साधुत्व काय उरे सज्जना रे ! ॥
शिला पानीय वरी घसणी पडतीसे, चंदना रे ! ॥
करवत कुठार, तुजचि लागिं पैल चंदना रे ! ॥
घालुनि दननावरि पाहों पाहाती थोरी, चंदना रे ! ॥
दिगंबरावांचून न धरीं आन साधु, चंदना रे ! ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : April 05, 2015
TOP