मुक्तेश्वरांची कविता
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
“सभेमाजी श्रेष्ठानिकटीं । कवणा काय बोलिजे गोष्टी ।
जया न कळे तो या सृष्टीं । मनुष्य म्हणतां लाजिजे ॥
शल्य होऊनी पर अंतरीं । शब्द राहे बहुकाळवरी ।
ऐसें बोले तो निर्धारीं । कीटकातुल्य जाणावा ॥
शूर नृपाळ नदी साधु । यांचा न कीजे मूळशोधू ।
मुखें बोलतां निंदावादू । कोण श्रेष्ठत्व पावला ? ॥
उदकापासोनि झाला अनळ । तेजें जाळी ब्रम्हांडगोळ ।
दधीचीचें अस्थि तेजाळ । वज्र भेदी पर्वता ।
द्रोणाचार्य गुरु आमुचा । द्रोणकलशीं उद्बव त्याचा ।
स्कंद आग्नेय कृत्तिकांचा । रौद्र गांगेय बोलिजे ॥
जगदगुरु व्यास भगवान । त्याचें उपजतें कवण स्थान ! ।
तुम्हां कैसें झालें जन । तें कां हृदयीं नाठवा ? ॥
द्दष्टि न घालूनि पादपमूळीं । समस्वाद पाहिजे फळीं ।
कर्दम सांडूनि अलिकुळीं । सुवास पद्मी सेविजे ॥
शरस्तंबी गौतमवीयें । देह धरिला कृपाचार्यें ।
ब्राम्हाणापासाव क्षत्रिये । जन्मले ऐसें बोलती ॥
अवलोकनें ज्याचिया द्दष्टी । कुंजर मरती कोठयानकोटी ।
तो सिंह जन्मला मृगीचे पोटीं । हें कैसेनि घडे पां ? ॥
असंख्य रोमाग्रीं गिरिवर । धरोनि बांधी जो सागर ।
तो हनुमंत वानरीकुमर । हें काय ज्ञाते बोलती ? ॥
N/A
References : N/A
Last Updated : April 06, 2015
TOP