मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
श्रीनाथदास ऊर्फ हरिदास

श्रीनाथदास ऊर्फ हरिदास

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


“आतां नमूं तो सदगुरु । जेणें मस्तकीं ठेविला कृपाकरु ।
तेणें हा संसारसागरु । सरता साचारूं पैं झाला ॥

जयजयाजी श्रीगुरुमूर्ति । सगुण व्यापक श्रीपति
तुज वर्णितां वेदश्रुति । मौन निश्चिती राहिल्या ॥

जयजयाजी अव्यक्ता, । पूर्णओधा सदोदिता ।
तुझे गुणानुवाद वर्णितां । शेषा स्तवितां नातुडे ॥
ब्रम्हादिक पुरंदर । निर्जर नेणती तुझा पार ।
मग जोडोनियां कर । नमिते झाले पायांसी ॥

ऐसियांची मति ठेंगणी । जाहली श्रीगुरु चूडामणि ।
तेथें मी प्राकृत वाणी । काय बोलणीं बोलों पां ॥

आतां बहु स्तुति करणें । करितां वाटे लाजिरवाणें ।
सूर्याचिया अंगा उटणें । काय लावणें घडेल ॥

ना तरी तो सुवर्णमेरु । रक्तयुक्त दिसे सुंदरु ।
त्यासी गुंजांचा शृंगारु । हा विचारु केंवि घडे ॥

अथवा तो क्षीरसिंधु । अमृतें भरला अगाघु ।
त्यासी शर्करा नैवेद्यु । हें विशदू केंवी घडे ॥

ना तरी त जान्हवी वारी । त्रैलोक्य पातकें निवारी ।
तयासी न्हाणावें, थिल्लरीं । ऐसें विचारीं केंवी घडे ॥

खद्योत सूर्यतेज मिरवी । विरोळा शेषातें शिकवी ।
उपजत बाळातें रांगवी । ऐसी कुसरी केंवी घडे ॥

मशक मेरूतें कंवटाळी । ट्टिवी सागरातें गिळी ।
मुंगी पृथ्वी पायांतळीं । हें भूमंडळी केवी घडे ॥
पांगुळ धांवे पवनापाठीं । आधळें बोवी नक्षत्रगांठी ।

पांगुळ धांवे पवनापाठीं । आधळें वोवी नक्षत्रगांठी ।
ना तरी बधिराच्या श्रवणपुटीं । शास्त्रगोष्टी ऐकणें ॥

हेंही घडों शके एके रीतीं । परी करितां नये तुझी स्तुति ।
यालागीं मौनेंचि पडती । नमन निश्चितीं पायांसी ॥

परी स्तुति करावया कारण एका । पुरविसी वाचा कौतुक ।
तूं दाता श्रीगुरु नायक । उदार देख म्हणोनी ॥

तरी हे माझी वाग्वल्ली । वाढवी आपुल्या कृपाजळीं ।
तेणें फळरसाळी । प्रेमकल्लोळीं अक्षर ॥

तुझा पद्महस्त तोचि मंडप । अमृतद्दष्टि छायारूप ।
तेणें वाग्वल्ली आपोआप । नादरूपें विस्तारली ॥

ऐसी वाग्वल्ली अदभुत । ज्ञानफळीं फळे सतत ।
त्या फळांचे भोक्ते संत । सादरें सुख सेविती ॥”

“प्रधानाचिया बोला । मन राजा संतोषला ।
घावो निशाणा दिधला । फोडिता झाला भांडार ॥

तें विषय भांडारें अगाध । शब्दस्पर्शरूपरसगंध ।
उचित दिधले प्रसिद्ध । मनें विविध जनांतें ॥

पुनरपि प्रवृत्ति अनुवादत । म्हणे ‘राया ! सांगतसें हित ।
विवाह करावा जी ! त्वरित । जाण नेमस्त मोहाचा” ॥

तें ऐकोनी नृपवर । प्रपंच पाचारिला शीघ्र ।
तयाची कन्या भुली सुंदर । ते सत्वर आणविली ॥

मग पाहूनि सुमुहूर्त । भुली प्रपंच हातीं धरित ।
अज्ञान उभय सत्तेंत । मोहो तेथें त्यापाठीं ॥

भ्रमें अक्षता घेतलिया । दोघांच्या अंजुळी सुदलिया ।
ॐ पुण्याहं म्हणोनि घातलिया । अविवेकें मस्तकीं ॥

प्रपंचाची श्री स्मृति । ते धार घाली यथा निगुती ।
आशा तृष्णादि समस्ती । ओवाळिती कुरवंडी ॥

ऐसें लग्न लागलें । दिसती वधूवरें चांगलें ।
मग बोहल्यावरी बैसविले । तें बळ हच्यासाचें ॥

अवक्रियेचें कंकण । अवनतीचें लोण ।
त्याच्या पालवीं संपूर्ण । बांधी जाण दुर्बुद्धि ॥

तया मोहा भुलीं शेंसपाठ । भरी प्रवृत्ति मन सुभट ।
मग प्रपंचें धरुनियां नेट । राजबिदी नीट मिरविलीं ।

लौकिक चांग राजबिदी । मेळवूनि भेदाची मांदी ।
जाली गृहप्रवेशसिद्धि । कुबुद्धि कुतर्क त्यांपाशीं ॥

त्यानंतरें प्रवृत्ति मन  तेथ । पाहोनियां सुमुहूर्त ।
मोहा राज्यीं बैसवीत । आनंदत ते काळीं ॥

तेथें वाजती मंगळतुरें । शद्ध अशद्वांची गंहिरें ।
तेणें नादें चराचर भरे । अति गजरें परियेसा ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP