मालो
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
जेवीं लग्नघडी साधिती वर्हाडी ।
तैसी माझी घडी सांभाळावी ॥१॥
जेवीस असला आंचवाया येई ।
तरी विठाबाई होय भेटो ॥२॥
हातींचा तांबूल मुखीं नका घालूं ।
फार काय बोलूं पांडुरंगा ॥३॥
मालो म्हणे मज घालावें पाठीसी ।
ठाव पायांपाशीं देई देवा ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 05, 2015
TOP