मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
आनंदतनय

आनंदतनय

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


काय वर्णूं लावण्य कामिनीचें । इंद्र चंद्रा नेणवे रूपजीचें ॥ध्रु०॥
भूमिपर्यंत रुळे नीळ वेणी । वरी शोभे ती भव्य नगश्रेणी ।
चंद्र आणि शिसफूल फुलावाणी । भाळिं भांगटिळा नासिकीं सुपाणी ॥१॥
चुडे कंगणिया हातसरे दोरे । कटीं शोभति ते भव्य कडदोरे ।
फार साजे सौंदर्य दैत्यदारे । कामिलोकांचें चित्त जें विदारे ॥२॥
वांकि वाहुवटें बाजुबंद बाळी । ल्यालि चोळी ते मोतियांची जाळी ।
हेमवसनाचे घोळ तळीं घोळी । मनीं कपटी बाहेरि दिसे भोळी ॥४॥
पदीं सांखळिया नूपुरादि वाळे । बिदी चालतसे दाखवीत चाळे ।
डोळे मोडितां गोपवृंद भाळे । जो तो पाहे तल्लीन राजबाळे ॥५॥
ऐशि सुंदरि ते मंदहास चाली । नंदरायाच्या मंदिरास आली ।
द्वारपालां टाकोनि तीव्र जाळीं । मोह पाडोनी मंदिरीं
पंकजाक्षी नि:शंक शांत बंकीं बंकीं । रक्षपालां पाडूनि मोहपंकीं ।
जाति झाली कृष्णासि घेऊं अंकी । जो हा दाता आनंदतनय रंकीं ॥७॥
दंतीं म्यां देवदंती धरुनि मुरडिला शैल कैलास गाढा ।
घेतां हस्तीं समस्तीं कडकडति कडे काय ती कालदाढा ॥
तेथें या कांबिटाच गरिब गुण किती प्रौढिही कोण येणें ।
माझे गाजोनि भोजे म्हणति मज असा कायसा कास घेणें ॥
पाहीन डोळां नवरी वराया । आणा म्हणे रावणराव राया ॥
विदेह बोले जिणतां पणातें । वरील ते आपण आपणातें ।

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP