मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
मालो कीर्तन (अभंग)

मालो कीर्तन (अभंग)

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


वंदन मंद न करुं त्या ज्याचें प्रख्यात नाम मालो हें ।
मळ जाया स्पर्शावें त्या अजडस्पर्शमणिमया लोहें ॥

कीर्तन (अभंग)

शुद्ध सत्वभावें सप्रेम कीर्तन ।
नर्तनीं उद्वर्तन उसंत वाढे ॥१॥
महावाक्य उपदेशें घनानंद वृद्धि ।
नि:सीम निजात्मद्दष्टी समता पाहे ॥२॥
धन्य ते सत्कथा धन्य तें कीर्तन ।
तत्त्वीं तन्मय मन निमोनी जातें ॥३॥
अक्षरीं तद्विदु चिद चिन्मय मूर्ति ।
यदनीं ब्रम्हास्फुर्ति स्फुरो लागे ॥४॥
अद्वैत विचार स्वरूप साक्षात्कार ।
मुक्त महाद्वार चौथ्या अंगें ॥५॥
अद्वैत विचार स्वरूप साक्षात्कार ।
मुक्त महाद्वार चौथ्या अंगें ॥५॥
शुद्ध बुद्ध मुक्त सत्य स्वभावें आगळा ।
निर्विकल्प कळा कळों ये ऐसी ॥६॥
नि:सीम निमाला मालो मालोपणें ।
प्रीतीचें बोलणें उद्धार तो ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP