मुक्तेश्वरांची कविता
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
“भजा भजा हो माझ्या एकनाथासी ।
त्रिकाळीं श्रीदत्तात्रयदर्शन ज्यासी ॥ध्रु०॥
एकनाथा शरण जातां चुके भवभय ।
एकावांचुनि न दिसे कांहीं अवघें अद्वय ।
एका भावें भजतां त्यासी लाधे निजसोय ।
एवढा महिमा ज्याचा वाचे वर्णितां नये ॥१॥
करुणेचा अवतार तो हा विश्वतारक ।
कळेना स्वामीचें सहजीं सहज कौतुक ।
कर्ज फेडी त्याचे घरिंचें कमळानायक ।
करी देव दास्य ज्याचें आज्ञाधारक ॥२॥
नाम एकोबाचें गोड आवडे मना ।
नामामृत सेवितां भेटी जाली चिद्धना ।
नावडे आणीक कांहीं मज त्याविना ।
नाठवे देहभान प्रेमें करितां कीर्तना ॥३॥
थर थर कांपे काळ स्वामी स्मरतां समर्थ ।
थक्कित होऊनि जन बहु हर्षें पावति परमार्थ ।
थकलें चित्त माझें पुरले मनिंचे मनोरथ ।
थय थय नाचत मुक्तेश्वर म्हणे जालों कृतार्थ ॥४॥”
N/A
References : N/A
Last Updated : April 06, 2015
TOP