मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
मात्रालक्षण.

मात्रालक्षण.

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


मात्रा म्हणजे स्वराचे उच्चारास जो काल लागतो तो.
श्लोक ( अनुष्टुभ्‍ )
लघूची ती एक मात्रा । गुरुच्या दोन मानिती ॥
मात्रावृत्तीं याच रीती । मात्रांनीं गण मोजिती॥१३॥
लघु अक्षराचें चिन्ह असें आहे; आणि गुरु अक्षराचें चिन्ह असें आहे.
मात्रागण.
आर्या.
गण एक एक होतो । मात्रांचा चार चार मात्रांनीं ॥
लघुगुरु भेदांनीं ते । मात्रांचे पांच गण होती ॥१४॥
मात्रागणलक्षण.
आर्या.
व्दिगुरु मगण, लल ग सगण । लगल जगण, गलल भगण, मनिं आणा ॥
चारहि लघु तोचि नगण । ऐसे हे पांच गण जाणा ॥१५॥
उदाहरणें.
मेधा, हा मगण; ह्यांत दोन गुरु आहेत.
सविता, हा सगण; ह्यांत दोन लघु, एक गुरु अशीं क्रमानें अक्षरें येतात.
जनास, हा जगण; ह्यांत लघु, गुरु, लघु,
भाजन, हा भगण; ह्यांत गुरु, लघु, लघु,
नवरस, हा नगण; ह्यांत चारही अक्षरें लघु आहेत.  
चार मात्रांचा गण भरावयास ह्या पांचांवांचून कोणताही गण येत नाहीं.

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP