मंदाक्रांता
लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले
मंदाक्रांता. य० ४, ६, ७.
मंदाक्रांता म्हणति तिजला वृत्त तें मंद चाले ॥
ज्याच्या पादीं म, भ, न त त हे आणि गा दोन आले ॥
एक्या पादीं गणति सतरा अक्षरांचीच होते ॥
काढीं रामा भवनदितुनी खातसें फार गोते ॥
चरणांत अक्षरें १७. गण - म, भ, न, त, त, ग,ग.
उदाहरण * उत्तररामचरित्र नाटक.
हाहा देवी हृदय फुटतें देह माझा गळाला ॥
वाटे शून्य त्रिभुवन मला, अंतरात्मा जळाला ॥
या आत्म्यानें किति तरि सदा दु: खभारा धरावें ॥
मोह व्यापी फिरफिरुनि म्यां काय आतां करावें ॥१॥
११ जाति - धृति. पादाक्षरें १८
N/A
References : N/A
Last Updated : June 11, 2018
TOP