वंशस्थ
लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले
वंशस्थ. य० पा०
तयास वंशस्थचि नाम ठेविती ॥ जयास जा ता ज र संघ सेविती ॥
पदांत मासांइतकीच अक्षरें ॥ पहा विचारुनि असत्य कीं खरे ॥
चरणांत अक्षरें १२. गण - ज,त, ज, र.
उदाहरण * रघुनाथ पंडित.
लते तळीं रुंद निरुंद कालवे ॥ गळोनि तेथें मकरंद कालवे ॥
परागही सांद्र तयांत रंगती ॥ फुलांसवें भृंगतती तरंगती ॥१॥
वंशस्थ वृत्तांतील प्रथम ज गणाऐवजीं त गण ठेविला कीं, इद्रवंशा वृत्त होतें.
N/A
References : N/A
Last Updated : June 11, 2018
TOP