मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
मदिरा

मदिरा

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


मदिरा. य० ६,६,६, ५.
ती मदिरा कवि बोलति जी मन मोहुनियां जन लाविल नादीं ॥
ज्या गण सात भ नामक आधिच दोन गुरु मग येतिल पादीं ॥
अक्षरसंमिति पाहति तूं जरि तेविस होतिल नेमचि याचा ॥
साधुनि सत्वर घ्या स्वहिता तुम्हि कांहिंच नेम नसे स्ववयाचा ॥१॥
चरणांत अक्षरें २३. गण - भ, भ, भ, भ, भ, भ, ग, ग.
उदाहरण स्वकृत.
पाहुनि दीनजनांस जळाविण मीन तसा अति दु: खित होतो ॥
कष्टउनी निजदेह जनां बहु तुष्टवि नित्यचि साधु अहो तो ॥
जो उपकार करी सुजनावरि अंतरिं निर्मळ भाव धरितो ॥
साधितसे परकीयहिता परि साधन आत्महिंतींच करी तो ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP