मध्यक्षमा
लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले
मध्यक्षमा. य० ४, १०.
मध्यक्षामा सुकवि म्हणति त्या वृत्ताला ॥
पादीं पादीं म भ न य ग ग येती ज्याला ॥
एके पादीं अवयव चवदा बा येती ॥
दाते ते जे तनुधन गरिबाला देती ॥
चरणांत अक्षरे १४. गण - म, भज, न, य, ग, ग.
उदाहरण स्वकृत.
मोठे दाते तनुधनसह ते गेले कीं ॥
स्वर्गा त्यांचे सुतहि न उरले भूलोकीं ॥
गौळीयांतें यदुपति दिसतो तो साधा ॥
सद्भक्तांची सहज दुरवितो जो बाधा ॥१॥
असंबाधा वृत्तांतील पांचवें गुरु अक्षर तेथून उचलून त्यापुढील सहा लघु अक्षरांच्या पुढें, म्हणजे अकराव्या अक्षराच्या जागीं, ठेविलें कीं, मध्यक्षामा वृत्त होतें, हें त्या दोन वृत्तांच्या उदाहरणांतील थोडयाशा फरकावरुन सहज लक्षांत येईल.
N/A
References : N/A
Last Updated : June 11, 2018
TOP